ST Bus : एसटीच्या लांब पल्ल्याच्या रोज 764 नवीन फेऱ्या धावणार, उन्हाळी गर्दीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

ST Bus : उन्हाळी हंगाम कालावधीत विभागांकडून प्रवाशी गर्दी हेाणाऱ्या  मार्गावर 15 एप्रिल,2025 पासून जादा फेऱ्या टप्याटप्याने सुरु करण्यात येणार आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये प्रवाशांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे ज्यादा वाहतूक करण्यात येणार आहे. यंदा देखील उन्हाळी ज्यादा वाहतूकीसाठी  दररोज लांब पल्ल्याच्या 764 फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून या सर्व फेऱ्या आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत दिनांक 15 एप्रिल,2025 ते दिनांक 15 जून,2025 पर्यंत एसटी मार्फत नियोजित फेऱ्या व्यतिरिक्त ज्यादा वाहतूक केली जाते. स्थानिक पातळीवर शटल सेवा आणि जवळच्या फेऱ्या संबंधित आगारातून चालवल्या जातात. परंतु उन्हाळी सुट्टीमुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या बसेस ची मागणी वाढते. त्यासाठी या काळामध्ये शालेय फेऱ्या रद्द करून , त्या ऐवजी लांब पल्ल्याच्या  फेऱ्या सुरू केल्या जातात.

(नक्की वाचा- HDFC आणि पंजाब अँड सिंध बँकेला रिझर्व्ह बँकेचा दणका, ग्राहकांवर काय परिणाम होणार?)

उन्हाळी हंगाम कालावधीत विभागांकडून प्रवाशी गर्दी हेाणाऱ्या  मार्गावर 15 एप्रिल,2025 पासून जादा फेऱ्या टप्याटप्याने सुरु करण्यात येणार आहेत. उन्हाळी हंगामासाठी एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयमार्फत राज्यातील विविध मार्गावरील 764 जादा फेऱ्यांना मंजूरी देण्यात आली असून, या जादा फेऱ्यांव्दारे दैनंदिन 521 नियतांव्दारे 2.50 लाख किमी चालवण्यात येणार आहे.

(नक्की वाचा-  Mumbai News : ऐश्वर्या राय बच्चनच्या लक्झरी कारला बेस्ट बसची धडक; पाहा VIDEO)

उन्हाळी जादा फेऱ्या संगणकीय आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तरी, प्रवाशांच्या सोयीसाठी रा.प. महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट www.msrtc.maharashtra.gov.in वर  तसेच npublic.msrtcors.com  या सकेतस्थळावर व मोबाईल ॲपव्दारे या बरोबरच रा.प.महामंडळाच्या बसस्थानकांवरील आरक्षण केंद्रावर आगाऊ आरक्षण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तरी प्रवाशांना उन्हाळ्याच्या सुट्टीतील प्रवासाचे नियोजन करून महामंडळाच्या मार्फत जादा वाहतूक सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रा.प.महामंडळाव्दारे करण्यात येत आहे.

Advertisement
Topics mentioned in this article