
आशिलालाच वकीलाने आपल्या मुलाच्या मदतीने ठार करण्याची धक्कादायक घटना नागपूरात घडली आहे. हरीश दिवाकर कराडे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना त्यांचे वकील अश्विन वासनिक आणि त्यांचा मुलगा अविष्कार वासनिक यांनी त्यांची कुऱ्हाडीने हत्या केली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बाप लेकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हरीश कराडे हे हवाईदलातून निवृत्त झाले आहेत. ते वकील असलेल्या अश्विन वासनिक यांचे शेजारी होते. त्यांना काही वर्षापूर्वी सेवेतून निलंबित करण्यात आले होते. याविरोधात कराडे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावेळी कोर्टात वासनिक यांनी कराडे यांची बाजू मांडली. पुढे त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले होते. शिवाय ते कामावरही रूजू झाले होते. तेव्हा पासून कराडे आणि वासनिक यांचे घरघुती संबधी निर्माण झाले होते. 1994 पासून हे दोघे एकमेकांना ओळखत होते. हत्ये पूर्वी कराडे यांनी वासनिक यांना फोन केला होता. त्यानंतर ते त्यांच्या घरी भेटले होते.
हेही वाचा - गर्भपातादरम्यान मृत्यू, कारमधून महिलेचा मृतदेह शहरभर फिरवला; भयंकर प्रकार पाहून पोलिसही हादरले!
दोघेही चांगले मित्र होते. त्यामुळे या दोघांच्या पार्ट्याही होत होत्या. अशीच पार्टी सुरू होती. त्यावेळी देवाण घेवाण वरून वाद निर्माण झाला. त्यात भांडण अगदी टोकाला गेले. त्यावेळी अश्विन वासनिक आणि त्यांचा मुलगा अविष्कार यांने कराडे यांच्यावर थेट कुऱ्हाडीने हल्ला चढवला. या हल्ल्यात ते जागेवरच ठार झाले.
हेही वाचा - प्रेयसी बरोबर बोलतोय पाहून प्रियकराचा संताप, थेट चारचाकी अंगावर घातली
याबाबतची तक्रार कराडे यांच्या पत्नीने पोलिसात केली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी तिथे त्यांना कराडे यांचा मृतदेह आढळून आला. त्यांना एक भारदस्त वस्तूने मारण्यात आल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. त्यांच्या तोंडातून रक्तही येत होते. शिवाय त्यांच्या अंगावर जखमाही दिसून आल्यात. शवविच्छेदनानंतर आणखी काही बाबी स्पष्ट होतील असे पोलिसांनी स्पष्ट केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world