मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच, कलाक्षेत्रातील मंडळींनीही आपल्या आवडत्या उमेदवारांसाठी प्रचार सुरू केला आहे. 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेते भाऊ कदम यांनी वडाळा येथील वॉर्ड क्रमांक 181 चे उमेदवार अनिलभाऊ कदम यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
"वडाळ्याचा विकास होणारच"
भाऊ कदम यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत अनिल भाऊंच्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले, "मी स्वतः वडाळ्यात राहिलो असल्याने अनिल भाऊ कदम यांना खूप जवळून ओळखतो. ते माझ्या परिचयाचे असून मी त्यांचे काम पाहिले आहे."
"लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अनिल भाऊ नेहमीच तत्पर असतात आणि कोणाच्याही मदतीला धावून जातात, असे भाऊ कदम यांनी नमूद केले. "जर अनिल भाऊ निवडून आले, तर वडाळ्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रामाणिक उमेदवाराला तुम्ही तुमची साथ द्या," असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
(नक्की वाचा- Holiday News: राज्यातील 29 शहरांमध्ये 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; वाचा शहरांची संपूर्ण यादी)
अनिल भाऊ कदम यांच्या सामाजिक बांधिलकीवर आणि जनतेसाठी केलेल्या सातत्यपूर्ण कार्यावर भाऊ कदम यांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. केवळ ओळखीपोटी नव्हे, तर अनिल भाऊंचा विकासाचा दृष्टीकोन आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी असलेली तळमळ यामुळे हा पाठिंबा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
वडाळ्यात चुरस वाढणार
भाऊ कदम यांचा मोठा चाहतावर्ग मुंबईत आहे. त्यांच्या या जाहीर पाठिंब्यामुळे वॉर्ड क्रमांक 181 मध्ये अनिल भाऊ कदम यांची बाजू भक्कम झाली असून, प्रतिस्पर्धी उमेदवारांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world