Winter Session 2025: अहेरी नगरपरिषदेत मुख्याधिकारी गणेश शहाणे यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देऊन नोकरी मिळविल्याची तक्रार लोकसेवा आयोगाकडे झाली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून निर्देश आल्यानंतरही कारवाई का होत नाही असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या काळात राज्यातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणाबाबत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला. राज्यात 359 कर्मचारी ,अधिकारी आहेत ज्यांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवली आहे.
(नक्की वाचा- VIDEO: पैशांचे बंडल अन् शिंदेंचा आमदार... कॅश बॉम्बच्या आरोपांनी राज्याच्या राजकारणात खळबळ)
अहेरी येथील गणेश शहाणे यांच्याबाबत अवर सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाकडून कारवाई करण्याचे निर्देश आल्यावरही कारवाई का करण्यात आलेली नाही? असा कोणता राजकीय दबाव आहे की या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही असा सवाल वडेट्टीवर यांनी सभागृहात उपस्थित केला.
(नक्की वाचा- Kolhapur News: परीक्षेसाठी निघालेल्या तरुणीवर काळाचा घाला! कोल्हापूर-सांगली महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू)
गणेश शहाणे यांनी बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर नोकरी बळकावली यावर उत्तर देताना मंत्री अतुल सावे म्हणाले की याबाबतची यादी सबंधित विभागाला पाठवण्यात आली असून तीन महिन्यात कारवाई करण्यात येईल हे स्पष्ट केले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world