जाहिरात

Air India Plane Crash: घाटकोपर विमान अपघाताच्या आठवणी झाल्या ताज्या, 'त्या' वेळी नक्की काय झालं?

ते विमान कोसळले त्यावेळी एक मोठा स्फोट झाला. त्यामुळे तिथे असलेल्या एका झाडाला आग लागली.

Air India Plane Crash: घाटकोपर विमान अपघाताच्या आठवणी झाल्या ताज्या, 'त्या' वेळी नक्की काय झालं?
मुंबई:

एअर इंडियाचं लंडनला जाणारं विमान अहमदाबादमध्ये कोसळलं. या विमानात 242 प्रवाशी असल्याचं एएनआयने सांगितलं आहे. हे विमान कोसळल्यानंतर मुंबईत घाटकोपरमध्ये कोसळलेल्या विमान अपघाताच्या  आठवणी या निमित्ताने पुन्हा एकदा ताज्या झाल्या आहेत. तो महिना ही जून होता. 28 जून 2018 रोजी घाटकोपरमध्ये हे विमान कोसळले होते. याच चाचणी उड्डाणादरम्यान हा अपघात झाला होता.  किंग एअरचे सी-90 चार्टर विमान होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला होता. त्यात दोन वैमानिक, दोन विमान देखभाल अभियंते, तसेच एक प्रत्यक्षदर्शी यांचा समावेश होता. दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी हे विमान कोसळले होते. त्या ठिकाणी एका इमारतीचे काम सुरू होते. मुंबई विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असतानाच घाटकोपर येथे हे विमान कोसळले होते. 2014 मध्ये उत्तर प्रदेश सरकारने बीचक्राफ्ट किंग एअर सी 90 टर्बोप्रॉप हे विमान मुंबईतील यूवाय एव्हिएशन कंपनीला विकले होते. अलाहाबादमध्ये या विमानानाचा अपघात झाल्यानंतर हा करार करण्यात आला होता.

ट्रेंडिंग बातमी - Ahmedabad Plane Crash Video: टेकऑफनंतर 10 मिनिटात विमान कोसळलं, अहमदाबाद दुर्घटनेचा भयंकर VIDEO

28 जून 2018 हा तो दिवस होता.  मुंबईत या काळात पाऊस असतो. दुपारची वेळ होती. घाटकोपर पश्चिम परिसरातल्या शंकर सागर इमारतीत अनेक जण बाहेर गप्पा मारत बसले होते.  यूवाय एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालकीचं ते विमान, जुहू इथून टेस्ट फ्लाईटसाठी या विमानाने आकाशात झेप घेतली. पण परत येत असताना ते  घाटकोपरमध्ये एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर कोसळले. विमानातील चारही कर्मचारी आणि रस्त्यावरील एका नागरिकाचा यात मृत्यू झाला होता. दोन जण जखमी झाले होते.

ट्रेंडिंग बातमी - Air India Plane Crash : एअर इंडियाचं विमान अहमदाबादमध्ये कोसळलं; 242 प्रवासी असल्याची माहिती

नागरी उड्डयन महासंचालनालय (DGCA) त्यावेळी काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या. 12  आसनी विमानाने जुहू विमानतळावरून चाचणी उड्डाणासाठी आकाशात झेप घेतली होती. ज्यावेळी हे विमान कोसळले त्यावेळी एकच हाहाकार माजला. सगळीकड़े धावपळ सुरू झाली. अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर त्यावेळी व्हायरल झाले. त्यात सर्वत्र धावपळ हाहाकार दिसत होता. ढिगाऱ्यातून ज्वाळा आणि काळा धूर निघत होता. अग्निशमन दलाचे जवान परिस्थितीवर नियंत्रण मिळवत होते. त्यावेळी अपघात स्थळी  मोठी गर्दी जमली होती. अनेक जण पावसात छत्र्या घेऊन ते दृष्य पाहात होते. 

ट्रेंडिंग बातमी - Ahmedabad Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमान कोसळले, 242 प्रवाशांचा जीव धोक्यात! वाचा सर्व अपडेट्स

ते विमान कोसळले त्यावेळी  एक मोठा स्फोट झाला. त्यामुळे तिथे असलेल्या एका झाडाला आग लागली. त्यानंतर ही आग पसरत गेली. विमान बांधकाम सुरू असलेल्या निवासी संकुलाच्या भिंतीवर कोसळले आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामुळे संपूर्ण परिसरात विमान इंधन पसरले होते.  अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच विमानाचे इंजिन, प्रोपेलर आणि लँडिंग गियरसारखे भाग पूर्णपणे जळून खाक झाले होते.

ट्रेंडिंग बातमी - Mumbai News : व्हायरल पोस्टने वाट लागली, महिन्याला 5 ते 8 लाख कमावणाऱ्या रिक्षावाल्यांना पोलिसांचा दणका

प्रत्यक्षदर्शीने त्यावेळी सांगितलं की, सुरुवातीला आम्हाला असे वाटले होते की बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील एका इलेक्ट्रिक बॉक्सला आग लागली असावी. परंतु जेव्हा आम्ही घटनास्थळी तपासणी केली तेव्हा आम्हाला एका माणसाचा जळालेला मृतदेह आढळला. तो विमान कोसळले तेव्हा दुचाकीवरून जात होता," असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.  ही आग विझवण्यासाठी एक तासाहून अधिक वेळ लागला. या अपघातानंतर घाटकोपरमध्ये काही काळ भीतीचं वातावरण होतं. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com