जाहिरात

"अजितदादांच्या विचारांचा वारसा पुढे नेणार!"; मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान' राबविण्याचा राष्ट्रवादीचा निर्धार

Ajit Pawar: अजितदादांचे ध्येय समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्याची सहा विभागांमध्ये विभागणी करून हे अभियान राबवले जाणार आहे.

"अजितदादांच्या विचारांचा वारसा पुढे नेणार!"; मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान' राबविण्याचा राष्ट्रवादीचा निर्धार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला पुढे नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभाग सेलची महत्त्वाची बैठक पार पडली. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन कार्यालयात ही शोकसभा आणि नियोजित बैठक संपन्न झाली. या बैठकीत 'अजितदादा पवार मागासवर्गीय सक्षमीकरण अभियान' संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्याचा एकमताने निर्धार करण्यात आला.

6 विभागांमध्ये राज्याची आखणी

अजितदादांचे ध्येय समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्याची सहा विभागांमध्ये विभागणी करून हे अभियान राबवले जाणार आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकण अशा प्रमुख विभागांमध्ये विशेष लक्ष केंद्रित केले जाईल. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग अधिक सक्रियपणे काम करेल.

(नक्की वाचा-  Ajit Pawar Plane Crash VIDEO: अजित पवारांच्या अपघाताचं नवीन CCTV Footage, विमानतळावर नेमकं काय घडलं?)

सामाजिक न्यायासाठी 'अजितदादा मॉडेल'

अण्णा बनसोडे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, अजितदादांनी नेहमीच शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारधारेवर काम केले. तीच परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी सामाजिक न्याय विभागाची भूमिका अधिक जनतेशी जोडलेली असावी. वंचित आणि दुर्बल घटकांपर्यंत पक्षाची भूमिका पोहोचवणे. सामाजिक न्यायाशी संबंधित शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पक्ष पातळीवर समन्वय वाढवणे.

(नक्की वाचा-  UP News: रात्री झोपी गेलेली तरुणी बनली 'नागीण'! सकाळी बेडरुमधील दृश्य पाहून अख्ख गाव हादरलं)

या बैठकीत सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, कार्याध्यक्ष बाळासाहेब करडक आणि विविध जिल्ह्यांचे शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. सर्व जिल्हाध्यक्षांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील समस्या आणि संघटनात्मक कामाचा आढावा सादर केला.  आगामी काळात जिल्हा आणि तालुका स्तरावर बैठका, जनजागृती अभियाने आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून पक्ष बांधणी अधिक मजबूत केली जाईल. "समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवणे हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल," असा विश्वास अण्णा बनसोडे यांनी यावेळी व्यक्त केला.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com