पक्षफुटीच्या 14 महिन्यांनंतर अजित पवारांचं मोठं वक्तव्य, जनतेसमोर दिली चुकीची कबुली!

गडचिरोली येथे एका जनसन्मान रॅलीला संबोधित करताना अजित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
गडचिरोली:

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना बहीण सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लोकसभा निवडणुकीत उतरवल्याबद्दल पुन्हा एकदा आपली चूक मान्य केली आहे. गडचिरोली येथे शनिवारी 7 सप्टेंबर रोजी एका जनसन्मान रॅलीला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, कुटुंबात फूट पाडण्याची चूक करायला नको. मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे. माझी चूक मी मान्य केली आहे. 

अजित पवार यांनी एका महिन्यात दोन वेळा या गोष्टीचा उल्लेख केला आहे. यापूर्वी ते 13 ऑगस्ट रोजी एका मराठी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, राजकारणात कोणालाही घरात घुसू द्यायला नको. माझी पत्नी सुनेत्राला माझ्याच बहिणीविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय चुकीचा होता. 

अजित पवार यांनी गडचिरोली येथील जनसन्मान रॅलीत धर्मराव बाबा आत्राम यांची मुलगी भाग्यश्री यांना फुटीपासून रोखण्याचा प्रयत्न केला. धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री या शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी याबाबत वक्तव्य केलं. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ते पुढे म्हणाले, मुलीवर वडिलांहून जास्त प्रेम कोणीच करू शकत नाही. अजित पवार हे धर्मराव यांच्या मुलीला म्हणाले, मुलीला तिच्या वडिलांहून जास्त कोणीच प्रेम करू शकत नाही. आत्रम यांनी मुलगी भाग्यश्री हिला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद दिलं. आता ती आपल्याच वडिलांच्याविरोधात लढण्याची तयारी करीत आहे. तिने आपल्या वडिलांना साथ द्यायला हवी. धर्मराव बाबा आत्राम 2019 अहेरी विधानसभेचे आमदार आहेत. जुलै 2023 मध्ये जेव्हा अजित पवारांनी काका शरद पवार यांच्यासोबत बंडखोरी केला तेव्हा अजित पवारांना साथ देणाऱ्यांमध्ये धर्मराव बाबादेखील होते. 

Advertisement

नक्की वाचा - 'जरांगेना आरक्षणाचा प्रश्न मिटवायचा नाही, मुख्यमंत्री होण्याची इच्छा !' मराठा आमदाराचा हल्लाबोल

अजित पवारांची बंडखोरी, पाचव्यांदा झाले उपमुख्यमंत्री

अजित पवार यांनी 2 जुलै 2023 रोजी एनसीपीच्या आठ आमदारांसह राज्यातील शिंदे सरकारमध्ये सामील झाले. यावेळी त्यांनी 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं होतं.