Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमान अपघाताचं गुढ उकलणार? रोहित पवार मोठा निर्णय घेणार?

Ajit Pawar Plane Crash : रोहित पवारांच्या या निर्णयामागे सरकारी तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर असलेला अविश्वास असल्याचे बोलले जात आहे. सरकारी तपासाला मोठा कालावधी लागतो.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ajit Pawar Plane Crash: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघाताचे गूढ उकलण्यासाठी आता सरकारी यंत्रणांऐवजी खाजगी यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या अपघाताचा 'खाजगी' तपास करून घेण्याचे संकेत दिले असून, यासाठी त्यांनी दिल्लीत मोठ्या हालचाली सुरू केल्या आहेत.

दिल्लीतील गुप्त भेटीगाठी

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित पवार सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी दोन नामांकित खाजगी गुप्तहेर संस्थांच्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली आहे. केवळ गुप्तहेरच नव्हे, तर रोहित पवारांनी काही हवाई तज्ज्ञांची  देखील भेट घेतली आहे. अपघाताच्या वेळी तांत्रिक बिघाड झाला होता की तो घडवून आणला होता, यावर या तज्ज्ञांकडून मत घेतले जाणार आहे. या दोन संस्थांपैकी एका संस्थेकडे लवकरच तपासाची अधिकृत जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे.

(नक्की वाचा-  Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)

सरकारी यंत्रणांवर संशय?

रोहित पवारांच्या या निर्णयामागे सरकारी तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर असलेला अविश्वास असल्याचे बोलले जात आहे. सरकारी तपासाला मोठा कालावधी लागतो, ज्यामुळे सत्य लोकांसमोर येण्यास उशीर होतो, असे पवारांचे मत आहे. तपास यंत्रणांच्या निष्पक्षतेवर यापूर्वीही रोहित पवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यामुळे तांत्रिक बाबींचा सखोल आणि वेगवान शोध घेण्यासाठी खाजगी एजन्सीचा मार्ग त्यांनी निवडला असल्याचं म्हटलं जात आहे.

(नक्की वाचा-  Nagpur Police Bharti: डॉक्टर, इंजिनिअर अन् फॅशन डिझायनर; पोलीस भरतीच्या रांगेत उच्चशिक्षितांची मोठी गर्दी)

काय असेल तपासाचा रोख?

खाजगी एजन्सी प्रामुख्याने  विमानामधील तांत्रिक डेटा, वैमानिकाचे शेवटचे संवाद आणि अपघातापूर्वी झालेल्या हालचालींचा वेगाने अभ्यास करेल. अजित पवारांच्या निधनाचे सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे, या भूमिकेवर रोहित पवार ठाम असल्याचे दिसून येते.
 

Advertisement