जाहिरात
2 hours ago

Sharad Pawar News Live Updates: बारामतीमध्ये राशपचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्यांवर भाष्य केले. सुनेत्रा पवार भेटायला आल्या तर त्यांना आनंदाने आशीर्वाद देईन, अशी प्रतिक्रिया यावेळेस त्यांनी दिली. तसेच सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाला, संधी दिली आनंद आहे, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष विलीनीकरणाच्या मुद्यावर शरद पवार म्हणाले की, "या सर्व चर्चेत फडणवीस कुठेच नव्हेत, त्यामुळे त्यांना याबाबत भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही. सध्या चर्चाच झाली नसताना त्याबद्दल भाष्य करणं योग्य नाही. माझा उल्लेख का केला हे समजलं नाही".

Amol Mitkari: अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या अस्थिंचे केले विसर्जन

Pune News Will Sharad Pawar and Deputy CM Sunetra Pawar Meet | NCP Merger Update

Sharad Pawar And Sunetra Pawar: राशपचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट होणार का? सर्वांचे लक्ष

Sharad Pawar News Live Updates From Sunetra Pawar Oath Ceremony To Ajit Pawar Plane Crash Accident NCP Leaders First Reaction

Sharad Pawar On Ajit Pawar News: राशपचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीमध्ये पत्रकार परिषद घेत अनेक मुद्यांवर थेट भाष्य केले.

Jay Pawar : अजित पवारांच्या अंत्यविधीच्या ठिकाणी जय पवार दाखल

  • अजित पवारांच्या अंत्यविधीच्या ठिकाणी जय पवार दाखल
  • स्मारकाबाबत माहिती घेतल्याचे म्हटलं जातंय

Baramati News: पार्थ पवार आणि जय पवार विद्या प्रतिष्ठान येथून बाहेर पडले

बारामती : पार्थ पवार आणि जय पवार विद्या प्रतिष्ठान येथून बाहेर पडले आहेत

Sharad Pawar: विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात बैठक संपली

बारामती: विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात बैठक संपली

Rohit Pawar: या राजकारणापुढं माणसाच्या जीवाची किंमत अक्षरशः शून्य झालीय: रोहित पवार

Sharad Pawar: शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात चर्चा

  • बारामती : विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांच्यात बैठक सुरू आहे
  • विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात पवार कुटुंबीय आणि प्रतिष्ठानचे विश्वस्त यांच्यात बैठक सुरू आहे
  • शरद पवार या विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत आणि  अजित पवार या प्रमुख विश्वस्त होते 
  • अजित पवार यांच्या जागी विश्वस्त म्हणून पार्थ किंवा जय पवार यांना घेण्याबाबत, अजित पवार यांच्या स्मारकाबाबत चर्चा  
  • या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्रित होण्यावर ज्या राजकीय चर्चा सुरू आहेत त्यावरही चर्चा होण्याची शक्यता 
  • बैठकीच्या ठिकाणी अजित पवार यांच्या बहीण विजया पाटील पोहोचल्या

Sharad Pawar: सुनेत्रा पवार मला भेटायला आल्या तर मी त्यांना आनंदाने आशीर्वाद देईन: शरद पवार

सुनेत्रा पवार मला भेटायला आल्या तर मी त्यांना आनंदाने आशीर्वाद देईन: शरद पवार

Sharad Pawar: मी अपघातासंदर्भात उगीचच शंका घेणार नाही: शरद पवार

- पेपरमध्ये वाचलं की आम्ही स्मारक करणार आहोत, पण ही गोष्ट मला माहिती नाही. त्या संस्थेचा अध्यक्ष मी आहे. मला ते ठावूक असलं पाहिजे, मात्र मी याबद्दलची नुसती चर्चा ऐकली आहे. याबद्दल काय करायचं याबद्दल एकत्र बसून चर्चा करू. सध्या चर्चाच झाली नसताना त्याबद्दल भाष्य करणं योग्य नाही. 

- माझा उल्लेख का केला हे समजलं नाही. या सगळ्या चर्चेत फडणवीस कुठेच नव्हते, त्यामुळे त्यांना याबद्दल भाष्य करण्याचा कोणताही अधिकार नाही :पक्ष विलीनीकरणाबाबत शरद पवारांची प्रतिक्रिया

- परस्परांना धीर देणं आणि पुढे कसं जायचं याकडे आमचे लक्ष आहे. राजकीय निर्णयाबद्दल आम्ही कोणाशीही चर्चा केलेली नाही.

- ऑथेंटिक माहिती मिळत नाही, तोपर्यंत मी अपघातासंदर्भात उगीचच शंका घेणार नाही.

- नरवणे हे देशाचे लष्करप्रमुख होते, त्यांनी काही लिखाण केले असेल आणि त्याचा उल्लेख विरोधीपक्षनेता करत असेल तर त्याला बोलण्याची संधी द्यायला हवी होती.

-लष्करप्रमुखांनी काहीतरी लिहून ठेवलं आहे, याचा अर्थ काहीतरी चिंतेचा विषय आहे. याबद्दल चर्चा झाली असती तर लोकांना वास्तव कळलं असतं.

Sharad Pawar सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर शरद पवार यांची प्रतिक्रिया

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर मला भाष्य करायचं नाही, शपथविधी झाला आनंद, संधी दिला आनंद  : शरद पवार

Sharad Pawar: शरद पवार यांची पत्रकार परिषद

शरद पवार यांची पत्रकार परिषद

  • 58 वर्षात संसदेत माझी गैरहजेरी कधीही नव्हती 
  • सभागृहात जाऊन मला अंदाजपत्रक मला ऐकता आलं नाही 
  • दुर्दैवी अपघातामुळे दिल्ली जाऊ शकलो नाही

Ajit Pawar Death News: अजित पवार अपघातासंदर्भात लोकसभेत स्थगन प्रस्ताव

अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात शिवसेनेचे (उबाठा) खासदार अरविंद सावंत यांचा लोकसभेत स्थगन प्रस्ताव 

Sharad Pawar: शरद पवार काटेवाडीमध्ये जाणार

राशपचे अध्यक्ष शरद पवार थोड्याच वेळात काटेवाडीकडे रवाना होणार   

Ajit Pawar: अजित पवार शेवटच्या फोनमध्ये काय म्हणाले होते, ऐका सविस्तर

Ajit Pawar Last Call: अजित पवार आणि कार्यकर्ता श्रीजीत पवार यांच्यामधील संवाद

अजित पवार : आम्ही पण सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जातो 

श्रीजीत पवार : नाही दादा, मला जे वाटलं ते बोललो

अजित पवार : माळी समाजाला सुपे गटातून जिल्हा परिषदमधून दिली आहे, सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

श्रीजीत पवार : हो दादा तुम्हाला जे वाटत तो निर्णय घ्या

श्रीजीत पवार हे अजित पवार यांचे नातेवाईक आहेत.

Ajit Pawar: विमान अपघाताच्या 10 मिनिटे आधी झाले बोलणे: श्रीजीत पवार

अपघाताच्या 10 मिनिटांपूर्वी अजित पवारांशी फोनवरून संवाद, श्रीजीत पवार 

Ajit Pawar Last Call News: 8.37 वाजता अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल: श्रीजीत पवार

8.37 वाजता अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल: श्रीजीत पवार

NCP PC: बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद

बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची पत्रकार परिषद, श्रीजीत पवार प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधत आहेत.

Supriya Sule Ajit Pawar: सुप्रिया सुळे-अजित पवार सेल्फी फोटो

राशप खासदार सुप्रिया सुळे यांनी स्टेटसमध्ये अजित पवार यांच्यासोबतचा सेल्फी फोटो शेअर केला

Ajit Pawar News: अजित पवार यांच्या अस्थिकलशाची यात्रा

Sunetra Pawar News: सुनेत्रा पवार यांची पत्रकार परिषद रद्द

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पत्रकार परिषद रद्द

Ajit Pawar: विमान अपघाताची डीजीसीएमार्फत चौकशी

अजित पवार यांच्या विमान अपघाताची डीजीसीएमार्फत चौकशी होणार

Ajit Pawar : अजित पवार यांचा फोनवरील शेवटचा संवाद

उपमुख्यमंत्री (दिवंगत) अजित पवार यांच्याशी फोनवर साधलेला शेवटचा संवाद ऐकवण्यात येणार आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com