जाहिरात

Ajit Pawar Death News : अजित पवारांचा अपघात, मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं? अमोल मिटकरींच्या मागणीने खळबळ

Ajit Pawar News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर मागणी केलीय.

Ajit Pawar Death News : अजित पवारांचा अपघात, मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं? अमोल मिटकरींच्या मागणीने खळबळ
"Ajit Pawar Death News: अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी अमोल मिटकरी यांची मोठी मागणी"
PTI And Amol Mitkari X

Amol Mitkari On Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आणखी एक मोठी मागणी केलीय. "DGCA नी ब्लॅक बॉक्सची सत्यपडताडणी अहवाल येण्याअगोदर आदरणीय अजित दादांचे दिनांक २८ जानेवारी २०२६ चे मुंबई विमानतळ मुख्य प्रवेशद्वारापासून ते विमानात बसेपर्यंतचे सर्व व्हिडीओ शुटिंग व CCTV फुटेज तत्काळ अधिकृतरित्या तात्काळ प्रसिद्ध करावे." अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केलीय. मिटकरी यांनी यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X'वर पोस्ट शेअर केलीय. अजित पवार यांचा घातपात झाल्याचा संशय अमोल मिटकरी वारंवार व्यक्त करत आहेत. अमोल मिटकर हे अजित पवार यांचे जवळचे व्यक्ती मानले जातात. अपघाताची सीबीआय चौकशी करण्याचीही मागणी त्यांनी केलीय.

(नक्की वाचा: Sharad Pawar News: सुनेत्रा पवार शपथविधीपासून ते अजित पवारांच्या अपघातापर्यंत, सर्वच मुद्यांवर शरद पवारांचे थेट भाष्य)

अमोल मिटकरी यांनी उपस्थित केले प्रश्न

अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसलाय. अजित पवार यांच्या प्रवासाचा मार्ग आणि पायलट अखेरच्या वेळेस का बदलण्यात आला? स्फोटामध्ये कागदपत्र कसे जळले नाहीत? असे गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. 

(नक्की वाचा: Sharad Pawar Sunetra Pawar Meeting: मोठी बातमी! शरद पवार आणि सुनेत्रा पवार बारामतीत, आज भेट होणार?)

अजित पवार यांचे अपघात निधन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास भीषण विमान अपघातात निधन झाले. तांत्रिक बिघाडामुळे लँडिग करताना विमान जमिनीवर आदळले आणि त्याचा भीषण स्फोट झाला. ही दुर्घटना इतकी भीषण होती की अजित पवारांसह विमानातील सर्वांचा जागीच मृत्यू झाला. अजित पवारांची ओळख त्यांच्या मनगटावरील घड्याळाने पटवण्यात आली. 29 जानेवारी रोजी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान कॉलेजच्या प्रांगणामध्ये त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेस अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी गर्दी केली होती. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com