- आकाश सावंत, प्रतिनिधी
Ajit Pawar Plane Crash Accident: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. अजित पवार या जगात नाहीत, यावर अजूनही कोणाचा विश्वास बसत नाहीय. दुसरीकडे त्यांच्या सच्च्या कार्यकर्त्याने केलेल्या खळबळजनक दाव्याने या घटनेला वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. राशपचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशी मागणी करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
सीसीटीव्ही फुटेज जाहीर करण्याची मागणी
खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय की, "अजितदादांचा एक सच्चा कार्यकर्ता, त्यांचा एक शिष्य म्हणून माझी एकच मागणी असेल; अपघाताचा तपास झाला पाहिजे. त्या घटनेवर संशय घ्यायला जागा नक्की आहे. दादा देवगिरीहून कधी निघाले? एअरपोर्टवर कधी पोहोचले? त्याचे सीसीटीव्ही फुटेज असेल पाहिजे. दादा कोणत्या गाडीने गेले, कोणता ड्रायव्हर होता, फ्लाइटमध्ये कधी बसले, एअरपोर्टमध्ये एण्ट्री केल्यापासून ते फ्लाइटमध्ये चढेपर्यंतचे सर्व सीसीटीव्ही समोर आले पाहिजे.
(नक्की वाचा: 'दादांच्या पायातून धूर येत होता, एक जण खाली उतरत होता' काळजाचा ठोका चुकवणारा 'तो' प्रसंग)
"विमान जमिनीला टेकण्यापूर्वीच ब्लास्ट झाला"
सकाळी 8.46 वाजताचे जे सीसीटीव्ही फुटेज दिसतंय, त्यामध्ये फ्लाइट जमिनीला स्पर्श करून क्रॅश झालेलं नाही, असा मला वाटतंय. यामध्ये मला जेवढं कळतंय त्यानुसार जमिनीला टेकण्यापूर्वीच विमानाचा ब्लास्ट झालाय. ब्लास्टमध्ये सुद्धा इंजिनच्या भागातील लोक बाहेर उडाले. त्यानंतर जमिनीला टेकल्यानंतर दुसरा स्फोट झाल्याचे दिसतंय. विमानात बॉम्ब होता? की जमिनीला स्पर्श न होताच इंजिनचा ब्लास्ट झाला? मला जे प्रथमदर्शनी दिसतंय ते बोलतोय. सर्व सत्य बाहेर आले पाहिजे".
(नक्की वाचा: Ajit Pawar Tattoo Video: निव्वळ प्रेम आणि निष्ठा! तरुणाने छातीवर काढला अजित पवारांचा टॅटू)
बजरंग सोनवणे यांच्या दाव्यामुळे खळबळबजरंग सोनवणे यांनी संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी केलीय. अपघाताच्या तांत्रिक बाजूवर संशय व्यक्त करताना त्यांनी खळबळजनक निरीक्षण नोंदवले आहे. सोनवणे यांच्या दाव्यांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. "विमानात बॉम्ब पेरला होता का? की जमिनीला स्पर्श न होताच इंजिनाचा स्फोट झाला?" असा थेट सवाल त्यांनी केलाय. प्रथमदर्शनी दिसणाऱ्या गोष्टी अत्यंत संशयास्पद असून, यामागील खरे सत्य बाहेर येणे गरजेचे आहे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे. आता या दाव्यांनंतर पोलीस प्रशासन आणि तपास यंत्रणा याकडे कशा प्रकारे पाहतात आणि अजित पवार यांच्या सुरक्षिततेबाबत काय नवीन माहिती समोर येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Ajit Pawar Death | अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का? बजरंग सोनवणेंकडून गंभीर प्रश्न उपस्थित