Ajit Pawar Tattoo Video: अजित पवार यांच्या अपघाती झालेल्या निधनामुळे संपूर्ण देशाला मोठा धक्का बसलाय. 28 जानेवारी रोजी बारामती विमानतळाजवळ त्यांचे विमान कोसळून मोठी दुर्घटना घडली. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झालाय. 29 जानेवारी रोजी त्यांच्या पार्थिवावर बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवार (Ajit Pawar News) यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. अजित पवार या जगात नाही, यावर लोकांचा विश्वास बसत नाहीय. समर्थक, कार्यकर्ते त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
छातीवर काढला अजित पवार यांचा टॅटू | Ajit Pawar Video
एका तरुणाने आपल्या छातीवर अजित पवार यांचा टॅटू काढून त्यांना श्रद्धांजली वाहिलीय. काहींना हे वेड वाटले, काहींना अतीभक्ती, तर काहींनी हा टॅटू म्हणजे अजित पवारांवरील कार्यकर्त्याची असलेली श्रद्धा, त्यांच्यासोबत असलेले नाते आणि भावनांचे प्रतीक असल्याचे म्हटलंय. माणूस जेव्हा एखाद्या व्यक्तीचा चेहरा आपल्या छातीवर कोरतो, तेव्हा तो फक्त शाईने आकृती रेखाटत नाही, तर आपल्या हृदयातल्या संबंधित व्यक्तीसंदर्भात असलेल्या भावना मांडण्याचा प्रयत्न करतो. तसाच काहीसा प्रयत्न हा तरुणाने केल्याचे दिसतंय.
(नक्की वाचा: Ajit Pawar Death News : अजित पवारांचा अपघात, मुंबई विमानतळावर नेमकं काय घडलं? अमोल मिटकरींच्या मागणीने खळबळ)
अजित पवार (Ajit Pawar Death News) हे नाव अनेकांसाठी फक्त एक राजकीय व्यक्तिमत्त्व नाही; तर संघर्ष, निर्णयक्षमता आणि ठाम भूमिका मांडणारे व्यक्ती होते, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणंय. ग्रामीण भागातून पुढे येत, जनतेच्या प्रश्नांसाठी उभे राहणारे नेतृत्व अनेक तरुणांना प्रेरणा देते. त्या प्रेरणेतूनच कदाचित या तरुणाने आपल्या छातीवर हा टॅटू गोंदवण्याचा धाडसी निर्णय घेतला असावा. शब्द अपुरे पडतात, तेव्हा माणूस अशा कृतीतून आपल्या मनातील भावना व्यक्त करतो. तरुणासाठी हा टॅटू म्हणजे सत्ता, प्रसिद्धी किंवा राजकारणापलीकडचा भावनिक बंध असावे.
पाहा व्हिडीओ Ajit Pawar Tattoo Video
(नक्की वाचा: Sharad Pawar News: सुनेत्रा पवार शपथविधीपासून ते अजित पवारांच्या अपघातापर्यंत, सर्वच मुद्यांवर शरद पवारांचे थेट भाष्य)
आजच्या काळात नाती क्षणिक आणि स्वार्थासाठी झालेली असताना एखाद्याप्रति अशी निष्ठा पाहणे दुर्मीळच.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world