देवा राखुंडे, बारामती
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचा परिणाम आता पवार कुटुंबीयांच्या दिवाळी उत्सवावर दिसून येत आहे. पहिल्यांदाच शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतंत्रपणे दिवाळी साजरी केली. अजित पवार आपल्या गावी काटेवाडी येथे दिवाळी साजरी करत आहेत. तर शरद पवार गोविंदबाग येथील आपल्या निवासस्थानी दिवाळी साजरी करत आहेत. यामुळे पवार कुटुंबियांची एकत्र दिवाळी साजरी करण्याची परंपरा खंडित झाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
यापूर्वी अजित पवार शरद पवार यांच्या दिवाळी समारंभाला हजेरी लावत असत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार आज काटेवाडी येथे दिवाळी पाडव्यानिमित्त नागरिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत. तर शरद पवार गोविंदबाग येथील निवासस्थानी जिथे कुटुंबीयांसह पक्षाचे पदाधिकारी, राजकीय मित्रांना भेटतील.
(नक्की वाचा - पवार कुटुंबात दुरावा वाढला? ऐन दिवाळीत बारामतीत काय झालं?)
खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत म्हटलं की, उपमुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची मला माहिती नव्हती. मात्र, गोविंदबागमध्ये आयोजित कार्यक्रमाची सर्वजण वाट पाहत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अजित पवाराचा दिवाळी पाडवा म्हणजे दिल्लीतील अदृश्य शक्तींचं यश असल्याचं त्यांनी म्हटलं.
( नक्की वाचा - लोकसभेला ताई, विधानसभेला दादा!अजित पवारांचं ते वक्तव्य पुन्हा चर्चेत का?)
यंदाच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीच्या या उत्सवाला महत्त्व आले आहे. ज्यात बारामतीमध्ये अजित पवार आणि त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) उमेदवार युगेंद्र पवार यांच्यात लढत होणार आहे. यापूर्वी लोकसभा निवडणुकीत घराण्यांमध्ये स्पर्धा होती. पक्ष फुटल्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यात रंजक लढत पाहायला मिळाली होती.
स्वप्नातंही असं वाटलं नव्हतं- मेहबूब शेख
स्वप्नातही असं वाटलं नव्हतं पण ईडी सीबीआयच्या कृपेने हे झालं, असं म्हणत मेहबूब शेख यांनी अजित पवारांच्या पाडव्यावर निशाणा साधला. मतदार शरद पवारांच्या पाठीशी उभे आहेत. भाजपने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच वॉशिंग मशीनमध्ये क्लीन करून घेतलं.