जाहिरात

Akola News अनाथांचा नाथ अन् जनतेची साथ, 800 अनोळखी मृतदेहांना खांदा दिला, अकोल्याच्या नगरसेवकाची सर्वत्र चर्चा

अकोल्यातील 'पराग गवई' हे नाव आज केवळ एक व्यक्ती न राहता माणुसकीचं प्रतीक बनलं आहे. ज्यांचे कोणीच नाही अशा अनोळखी मृतदेहांचा वाली म्हणून पराग गवईंना ओळखलं जातं. त्यांच्या समाजसेवेची राज्यभर होतेय चर्चा, वाचा इनसाईड स्टोरी..

Akola News अनाथांचा नाथ अन् जनतेची साथ, 800 अनोळखी मृतदेहांना खांदा दिला, अकोल्याच्या नगरसेवकाची सर्वत्र चर्चा
Akola Corporator Parag Gawai

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola Municipal Corporator Parag Gawai : अकोल्यातील 'पराग गवई' हे नाव आज केवळ एक व्यक्ती न राहता माणुसकीचं प्रतीक बनलं आहे. ज्यांचे कोणीच नाही अशा अनोळखी मृतदेहांचा वाली म्हणून पराग गवईंना ओळखलं जातं. आजवर त्यांनी तब्बल 800 अनोळखी मृतदेहांना खांदा देत स्वखर्चाने त्यांचे विधिवत अंत्यसंस्कार केले आहेत. पोलीस प्रशासन असो वा रुग्णालय व्यवस्था,ओळख न पटलेल्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली की पराग गवई हे हक्काचं नाव म्हणून पुढे येतं. “अनाथांचा नाथ आणि बेवारीस लोकांचा देवदूत” म्हणून गेल्या दोन दशकांपासून ते समाजसेवेचं काम करतात. अकोल्याच्या सार्वत्रिक निवडणुकीत पराग गवईंना 8993 मतं मिळाली आणि ते  अकोल्यातील प्रभाग क्रमांक 14 मधून निवडून आहे. विशेष म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीचं संपूर्ण पॅनलच विजयी झालं.

रुग्णसेवा परमोधर्म : रक्तदानातून उभा केला सेवायज्ञ

रुग्णसेवा केल्याशिवाय पराग गवई यांना चैन पडत नाही. वयाच्या 40 व्या वर्षी त्यांनी स्वतः 43 वेळा रक्तदान केलं आहे.एवढंच नव्हे तर युवकांना प्रेरित करत त्यांच्या माध्यमातून आजपर्यंत 7 हजारांहून अधिक रक्तपिशव्या संकलित केल्या आहेत.  क्ताची नितांत गरज असताना रुग्णांच्या नातेवाईकांची होणारी धावपळ त्यांनी जवळून पाहिली. त्यातूनच युवकांची फौज उभी करत त्यांनी रक्तदान शिबिरांची चळवळ सुरू केली. वर्षातून तीन ते चार रक्तदान शिबिरांचे आयोजन करून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे, यासाठी ते अहोरात्र झटत असतात.

नक्की वाचा >>Ulhansnagar News : वंचितचे 2 नगरसेवक नॉट रिचेबल, उल्हासनगर महापालिकेत फासा पलटणार, 'या' पक्षाच्या संपर्कात

जेवणाच्या ताटावरून उठून सेवा : गोरगरिबांचा आधार

सरकारी रुग्णालयातील गैरसोय, हेडसांड आणि अशिक्षित, ग्रामीण रुग्णांची होणारी फरफट पाहून पराग गवई यांनी समाजसेवेला आयुष्य अर्पण केलं. आज त्यांचा मोबाईल नंबर अकोल्यात सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलेला आहे. ओळखीचा असो वा अनोळखी, कुणाचाही निरोप आला की ते जेवणाच्या ताटावरून उठून मदतीला धाव घेतात. पावसाळ्यात तुंबलेल्या नाल्यांची साफसफाई असो किंवा आपत्तीच्या वेळी बचाव कार्य, समाजकार्याच्या प्रत्येक कामात ते नेहमी अग्रेसर असतात.

नक्की वाचा >>  Pune News: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! 19 जानेवारीला 'हे' रस्ते दिवसभर राहणार बंद, 'त्या' शाळांनाही सुट्टी

रुग्णसेवक ते नगरसेवक : जनतेने दिला सेवेला कौल

गेल्या दोन दशकांच्या निस्वार्थ सेवेला जनतेने निवडणुकीत कौल दिला. सार्वत्रिक निवडणुकीत पराग गवई यांना 8993 मतांचा आशीर्वाद मिळाला. अकोल्यातील प्रभाग क्रमांक 14 मधून वंचित बहुजन आघाडीचे संपूर्ण पॅनल त्यांच्या नेतृत्वाखाली निवडून आले. सर्वसाधारण (क) जागेतून रुग्णसेवक ते नगरसेवक असा प्रवास करत त्यांनी नवा आदर्श उभा केला आहे.चौथीत असताना आईला रक्त मिळालं नाही, त्या वेदनेतून सुरू झालेला उपक्रम आज जनतेच्या विश्वासात बदलला आहे. नगरसेवक म्हणून प्रभागाचा सर्वांगीण विकास करणारच,असा विश्वास पराग गवई यांनी व्यक्त केला असून त्यांच्या कार्याचं जिल्हाभरात कौतुक होत आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com