जाहिरात

Arun Gawli: अंडरवर्ल्ड डॉनलाही सोशल मीडियाची पडली भुरळ; बायको, मुलीसह अनेकांकडून दिले जातायत सामाजिक संदेश

Arun Gawli: अरुण गवळीचे कुटुंब सोशल मीडियावर सक्रिय! गीता गवळी आणि योगिता गवळी डिजिटल प्लॅटफॉर्मचा कसा वापर करत आहेत? जाणून घ्या सविस्तर माहिती.

Arun Gawli: अंडरवर्ल्ड डॉनलाही सोशल मीडियाची पडली भुरळ; बायको, मुलीसह अनेकांकडून दिले जातायत सामाजिक संदेश
Arun Gawli: अरुण गवळीचे कुटुंब सोशल मीडियावर सक्रिय!
Asha Arun Gawli Instagram

Arun Gawli: मुंबईतील कु्ख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि राजकारणी अरुण गवळी जो'डॅडी' म्हणून ओळखला जातो, त्याचे कुटुंबीय आता सोशल मीडियावर सक्रिय झाले आहे. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गवळी कुटुंबाने आपली राजकीय आणि सार्वजनिक प्रतिमा जपण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतल्याचे दिसले. 

सोशल मीडियावर नेमके कोणती भूमिका मांडली जाते?

अरुण गवळीच्या दोन्ही लेकी आणि पत्नी दगडी चाळीतील फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. याद्वारे राजकीय उपक्रम, स्थानिक रहिवाशांशी साधलेला संवाद आणि वर्ष 2025च्या अखेरीस अरुण गवळीची जेलमधून पेरॉलवर झालेल्या सुटकेची माहिती शेअर केली होती.  सोशल मीडियावर सक्रिय होण्याचा उद्देश 'अखिल भारतीय सेना' या पक्षाचा डिजिटल प्लॅटफॉर्म्स प्रसार-प्रचार करणे आणि भायखळा परिसरातील कुटुंबाचा प्रभाव कायम राखणे हा असल्याचे दिसते.

कुटुंबातील प्रमुख सदस्य सोशल मीडिया सक्रिय 

1. गीता गवळी: अरुण गवळीची मुलगी आणि माजी नगरसेविका
गीता गवळी या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर सक्रिय आहेत. तिने आपल्या नगरसेविका म्हणून केलेल्या कामाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि अखिल भारतीय सेनेच्या उमेदवारीचा प्रचार करण्यासाठी या व्यासपीठाचा वापर केला आहे.

(नक्की वाचा: Ulhasnagar News: महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून सत्ताधारी शिवसेना- भाजपात वाद, प्रकरण कोर्टात जाणार)

2. योगिता गवळी (वाघमारे)

अरुण गवळीची दुसरी मुलगीही इंस्टाग्रामवर  सक्रिय असून वर्ष 2025च्या BMC निवडणुकीतून तिने राजकीय मैदानात पाऊल ठेवले आहे. निवडणुकीतील प्रचाराचे अपडेट्स, लोकांच्या भेटीगाठी आणि वडिलांच्या मुंबईतील परतीबद्दल माहिती शेअर करत आहेत.

(नक्की वाचा: Mumbai News: घर, कलिंगड, बिर्याणी.. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; मुंबई हादरली, नेमकं काय घडलं?)

3. आशा गवळी

अरुण गवळीची पत्नी आशा गवळी देखील सामाजिक संदेश, माहितीसह वेगवेगळ्या गोष्टी व्हिडीओ-फोटोच्या माध्यमातून सोशल मीडिया शेअर करत असते.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com