जाहिरात

मुंबईसाठी 'मेगा' प्लॅन! 238 स्वयंचलित दरवाजांच्या लोकल अन् नव्य प्लॅटफॉर्म्सचे जाळे; रेल्वेमंत्र्यांची घोषणा

मुंबईत सध्या दररोज सुमारे 120 मेल-एक्सप्रेस आणि 3,200 पेक्षा जास्त लोकल गाड्या चालवल्या जातात. ही प्रचंड गर्दी आणि प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता, स्वयंचलित दरवाजे असलेला हा प्रकल्प मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

मुंबईसाठी 'मेगा' प्लॅन! 238 स्वयंचलित दरवाजांच्या लोकल अन् नव्य प्लॅटफॉर्म्सचे जाळे; रेल्वेमंत्र्यांची घोषणा

मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकार अनेक मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहे. बुधवारी संसदेत माहिती देताना केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, मुंबई रेल्वे नेटवर्कसाठी 238 नवीन लोकल गाड्या खरेदी केल्या जात आहेत, ज्यामध्ये स्वयंचलित दरवाजा बंद करण्याची प्रणाली असेल.

मुंबईत सध्या दररोज सुमारे 120 मेल-एक्सप्रेस आणि 3,200 पेक्षा जास्त लोकल गाड्या चालवल्या जातात. ही प्रचंड गर्दी आणि प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता, स्वयंचलित दरवाजे असलेला हा प्रकल्प मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. रेल्वेमंत्र्यांनी मुंबईतील विविध स्थानकांवर सुरू असलेल्या प्रकल्पांची सविस्तर यादी देखील सादर केली आहे.

(नक्की वाचा-  Navi Mumbai: नवी मुंबई पुन्हा हादरली! खारघर आणि कोपरखैरणेतून पुन्हा दोन मुली बेपत्ता; आकडा 458 वर)

मुंबईतील पायाभूत सुविधांचा विस्तार

  • वांद्रे येथील 3 पिट लाईनचे काम आधीच पूर्ण झाले आहे.
  • लोकमान्य टिळक टर्मिनस डेपोच्या विस्ताराचे काम प्रगतीपथावर आहे.
  • परळ येथे 6 नवीन प्लॅटफॉर्म बांधले जात आहेत.
  • कल्याण या महत्त्वाच्या जंक्शनवर 6 नवीन प्लॅटफॉर्मचे काम सुरू आहे.
  • पनवेल आणि कळंबोली या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी 5 नवीन प्लॅटफॉर्म तयार केले जात आहेत.
  • वसई रोड येथे 6 नवीन प्लॅटफॉर्मचे काम सुरू आहे.
  • जोगेश्वरी 2 नवीन प्लॅटफॉर्म.
  • दादर 1 अतिरिक्त प्लॅटफॉर्म.
  • मुंबई सेंट्रल येथे 24 कोचच्या गाड्या उभ्या राहण्यासाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवली जात आहे.

तत्काळ तिकीट बुकिंगमध्ये मोठी सुधारणा

प्रवाशांना कन्फर्म तिकीट मिळवण्यासाठी होणारी अडचण दूर करण्यासाठी रेल्वेने आधार बेस्ड ओटीपी पडताळणी प्रणाली लागू केली आहे. ही प्रणाली सध्या 322 गाड्यांच्या ऑनलाइन तत्काळ बुकिंगसाठी सक्रिय आहे. यामुळे तत्काळ तिकिटांची उपलब्धता सुमारे 65 टक्क्यांनी वाढली आहे. रिझर्व्हेशन काउंटरवर ही यंत्रणा 211 गाड्यांसाठी सुरू झाली असून, 96 सर्वात लोकप्रिय गाड्यांमध्ये कन्फर्म तिकीट मिळण्याचा वेळ 95 टक्क्यांनी सुधारला आहे.

(नक्की वाचा-  Shocking VIDEO: जमावाने घेरलं, धक्काबुक्की.. गर्दीच्या गैरवर्तनाने अभिनेत्री निधी अग्रवाल हादरली)

सायबर सुरक्षेवर भर

रेल्वेमंत्र्यांनी माहिती दिली की, तिकीट बुकिंगमधील काळाबाजार रोखण्यासाठी कडक पावले उचलली जात आहेत. जानेवारी 2025 पासून आतापर्यंत सुमारे 3 कोटी संशयास्पद युजर आयडी निष्क्रिय करण्यात आले आहेत. तसेच, 'AKAMAI' सारख्या अँटी-बोट सोल्यूशन्सचा वापर करून अनधिकृत युजर्सना ब्लॉक केले जात आहे, जेणेकरून सामान्य प्रवाशांना सहज तिकीट बुक करता येईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com