किशोर बेलसरे, नाशिक
गुन्हेगारांना पोलिसांची भीती वाटते की नाही असा प्रश्न नाशिकमधील एका घटनेमुळे निर्माण झाला आहे. कारण चोरट्यांना थेट नाशिक पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यात शिरुन चोरीचा प्रयत्ना केला आहे. सुदैवाने चोरांचा हा प्रयत्न फसला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, जुने सीबीएस या ठिकाणी असलेल्या पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यात घुसून चोरट्यांनी चंदनाच्या चोरीचा प्रयत्न केला. 5 ऑगस्ट रोजी ही घटना घडली असली तरी याबाबत सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे 10 ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत असून, एक प्रकारे पोलीस यंत्रणेलाच चोरांनी आव्हान दिल्याची परिस्थिती आहे.
(नक्की वाचा- 'तुमच्या आजोबांना विचारा किती कुटुंब...' विखे पाटील रोहित पवारांवर भडकले)
चंदन चोरीचा हा प्रकार असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत तशी तक्रार अंमलदार उगलाल चौरे यांनी दाखल केली आहे. शहरात चंदन चोरी टोळी सक्रिय झाली असून या टोळीने पोलिसांची डोकेदुखी वाढवली आहे.
नाशिक पोलीस अधीक्षकांचं निवासस्थान शहराच्या मध्यवर्ती भागात जुन्या सीबीएस येथे आहे. तेथे चोरांना चोरीचा प्रयत्न केला. या चोरांनी शहरातील अंबड एमआयडीसीतील टेक्नो फोर्स कंपनीच्या आवारातील दोन झाडे देखील चोरून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात देखील एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरांचा लवकरात लवकर शोध लावणे पोलिसासमोर मोठं आव्हान असणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world