बदलापुरात (Badlapur Crime) चिमुरडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे आंदोलन पेटलेलं असताना दुसरीकडे बदलापुरातूनच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक कारचालक बेदरकारपणे (Badlapur Viral Video) दुसऱ्या गाडीला जाणूनबुजून धडक देत असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून कोणाचाही संताप होईल.
बदलापूर अंबरनाथ मार्गावर रागाच्या भरात एका व्यक्तीवर गाडी घालण्याची घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडली आहे. मुलगा सतीश शर्मा आणि वडील बिंदेश्वर शर्मा यांच्यात वाद झाला होता. वडील बिंदेश्वर हे सतीशची पत्नी, मुलगा आणि इतर सदस्यांना घेऊन मुंबईकडे निघाले होते. त्याचवेळेस मुलगा सतीशने गाडीचा पाठलाग केला.
नक्की वाचा - बदलापुरातील 'ती' शाळा भाजपसंबंधित, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
पाठलाग करता करता ते बदलापूर-अंबरनाथ मार्गावर आले. एम्पायर प्रकल्पासमोर सतीश शर्माने त्याच्याच कुटुंबातल्या सदस्यांच्या गाडीला धडक दिली. सतीश शर्माच्या गाडीच्या धडकेत दोन पादचारी गाडीखाली फरफटत नेले.
सतीश शर्मा एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने गाडी वळवून पुन्हा त्याची पत्नी, मुलगा असलेल्या गाडीला समोरून धडक दिली. या गाडीत त्याचा मुलगा बसला होता. धडक देताच तो घाबरला आणि आरडाओरडा करू लागला. लेकाची आर्त हाक ऐकूनही सतीश थांबला नाही. कुटुंबीयांच्या वाहनाच्या मागे थांबलेल्या दुचाकीस्वारालाही त्याने धडक दिली. या धडकेत ओम चव्हाण आणि हर्ष बेलेकर हे दोघे जखमी झाले आहेत. बापलेकाचं भांडण लोकांच्या जीवावर आलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या मानसिकतेवर संताप व्यक्त केला जात आहे.
अंबरनाथ येथील कल्याण बदलापूर राज्य महामार्गावरील चिखलोली भागात मंगळवारी संध्याकाळी कौटुंबिक वादातून घरातीलच व्यक्तीने दुसऱ्या वाहनातील आपल्याच कुटुंबातील सदस्यांच्या वाहनाला समोरून जोरदार धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत माथेफीरू वाहन चालकाच्या धडकेत दोन नागरिकही गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. बदलापूर येथे राहणारे सतीश शर्मा यांचे वडील बिंदेश्वर शर्मा हे त्यांच्या कुटुंबातील सतीशची पत्नी, नातू तसेच कुटुंबातील इतर सदस्यांना आपल्या कुलाबा मुंबई येथील निवासस्थानी आपल्या वाहनाने घेवून जात होते. मात्र सतीश यांचा पत्नी तसेच कुटुंबातील इतर सदस्यांसोबत झालेल्या वादाच्या रागातून सतीश याने आपल्या कुटुंबाच्या वाहनाचा पाठलाग करत राज्य महामार्गावरील त्यांच्या वडिलांच्या दुसऱ्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. तसेच रस्त्यावरील दोन पादचाऱ्यांनाही फरफडत नेले. त्यानंतर पुन्हा पुढे नेलेलं वाहन मागे वळून दुसऱ्या वाहनातील आपल्याच कुटुंबाच्या वाहनाला समोरून जोरदार धडक दिली. या घटनेत समोरील वाहना मागे असलेले मोटर सायकलस्वार ओम चव्हाण व हर्ष बेलेकर यांना जोरात ठोकर बसून ते फॉर्च्युनर गाडी खाली आल्याने जखमी झाले. यानंतर रस्त्यावरील नागरिकांनी जखमींना जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तर या प्रकरणी रात्री उशिरा आरोपी विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.