जाहिरात

बदलापुरातील 'ती' शाळा भाजपसंबंधित, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप

आम्हाला 1500 रुपये नको तर मुलींची सुरक्षा हवी असल्याची प्रतिक्रिया जमलेल्या महिलांकडून केली जात आहे.

बदलापुरातील 'ती' शाळा भाजपसंबंधित, उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप
मुंबई:

बदलापुरातील एका नामांकित शाळेतील दोन चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर शहरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी 12 तासांनंतर प्रकरण दाखल करून घेतलं, याशिवाय शाळा संचालकांकडून तब्बल चार दिवसांनी यावर कारवाई केल्यामुळे पालक संतापले आहेत. आज सकाळपासून या संतप्त जमावाने बदलापुरात रेलरोका केला, याशिवाय मुख्य रस्तेही बंद करण्यात आले आहेत. शिवाय आंदोलन पांगवणयासाठी आलेल्या पोलिसांवर दगडफेक करण्यात आलं. 

या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. जमावाकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरही संताप व्यक्त केला आहे. आम्हाला 1500 रुपये नको तर मुलींची सुरक्षा हवी असल्याची प्रतिक्रिया जमावाकडून केली जात आहे. यावर उद्धव ठाकरेंनी मोठा आरोप केला आहे. ही शाळा भाजपशी संबंधित असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे. याबाबत ठाकरे म्हणाले, ही शाळा भाजपच्या लोकांशी संबंधित होती असे मला कळाले आहे. कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता यात असला तरी त्यावर विनाविलंब कारवाई झाली पाहीजे.  यात जर भाजपचे कार्यकर्ते असले तर निबंध घेऊन सोडून देणार आहात का ? राजकारण न करता लवकरात लवकर कारवाई झाली पाहीजे.