बदलापूरच्या (Badlapur Child Abuse) शाळेतील चिमुकलीवर झालेल्या बलात्काराच्या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाकडून दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे सुमोटो याचिकेअंतर्गत या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. बदलापूरच्या शाळेतील चिमुकलीवर झालेल्या बलात्काराचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आहे. उच्च न्यायालयाने स्वत:हून या प्रकरणाची दखल घेत सुनावणी निश्चित केली. सुओमोटो याचिकेअंतर्गत आज या प्रकरणी सुनावणी होणार आहे.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सकाळी 10.30 वाजता सुनावणी होणार आहे. वास्तविक ही लैंगिक शोषणाची घटना बदलापूर येथील आदर्श विद्यालयात 12 आणि 13 ऑगस्ट रोजी घडली होती. 23 वर्षीय सफाई कामगार अक्षय शिंदे याने बालवाडीत शिकणाऱ्या दोन मुलींचे लैंगिक शोषण केले. या घटनेनंतर दोन्ही मुली शाळेत जाण्यास घाबरत होत्या.
नक्की वाचा - बदलापूरच्या नराधमाचे अवघ्या 24 वर्षात 3 लग्न; तिन्ही बायका गेल्या सोडून
मुलीच्या पालकांना संशय आल्याने त्यांनी त्यांच्या मुलीची चौकशी केली. त्याने सगळा प्रकार सांगितला. पहिल्या मुलीच्या पालकांनी दुसऱ्या मुलीच्या पालकांशी संपर्क साधला. त्यानंतर दोन्ही मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दोन्ही कुटुंबीयांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे यांनी पॉक्सो प्रकरण असूनही एफआयआर नोंदवण्यास विलंब केला. पीडित कुटुंबीयांनी सामाजिक कार्यकर्त्यांकडे मदत मागितल्यानंतर बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.