बदलापुरात रस्ते बंद, रिक्षा बंद, रेल्वे बंद, शाळेत तोडफोड; शाळेविरोधात उद्रेक वाढला!

'आदर्श' नागरिक तयार करणाऱ्या बदलापुरातील नामांकित शाळेने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपामुळे नागरिक संतप्त झाले आहे.

Advertisement
Read Time: 1 min
बदलापूर:

गेल्या सहा दशकांहून जास्त काळापासून सुरू असणाऱ्या बदलापुरातील नामांकित शाळेकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे. 'आदर्श' नागरिक तयार करणाऱ्या बदलापुरातील नामांकित शाळेने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपामुळे नागरिक संतप्त झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येणार असल्याच्या सूचना दिल्या. या प्रकरणात शाळा संचालकांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय शाळांमध्ये कोणत्याही कर्मचाऱ्याची भरती करताना त्याची संपूर्ण तपासणी करून घेणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं. 

ही घटना 13 ऑगस्ट रोजी घडली होती. मात्र यावर 16 ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातही पीडितेच्या पालकांना तब्बल बारा तास वाट पाहावी लागली. या प्रकरणात शाळा प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज गहाळ केल्याचा आरोप केला जात आहे. दुसरीकडे घटनेच्या चार दिवसांनी शाळा प्रशासनाने यावर कारवाई केली. यामुळे पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 

नक्की वाचा - बदलापूर तापलं! चिमुरडीवर अत्याचार प्रकरणात रेल्वे रोखली, रिक्षा बंद, शाळेच्या गेटवर मोठी गर्दी

बदलापुरात नागरिकांचा आक्रोश

बदलापूरात मुख्य रस्ते बंद करण्यात आले असून आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत...

रेले रोको करीत मुंबई आणि कर्जतला जाणाऱ्या रेल्वे सेवा ठप्प..

संतप्त जमाव शाळेत घुसरला, तोडफोडीची प्रकरणं

बदलापुरातील रिक्षा संघटनेचा बंदमध्ये सहभाग

Advertisement