बदलापुरातील (Badlapur News) एका नामांकित शाळेतील शिशुवर्गात शिकणाऱ्या (Badlapur Child abuse) दोन चिमुकल्यांवर एका 23 वर्षीय सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केल्याचं उघड झाल्यानंतर शहरातून संताप व्यक्त केला जात आहे. साडे तीन ते चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. शाळेकडून हे प्रकरण दाबले गेल्याचा आरोप केला जात असल्याने पालकांनी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला. आज बदलापुरात बंद पुकारण्यात आला असून शाळेच्या गेटवर नागरिकांचा मोठा जमाव एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.
याशिवाय काही नागरिकांनी बदलापुरात रेल रोको केला. बदलापूर रेल्वे स्थानकात मुंबईकडे जाणारा मार्ग रोखला. आज सकाळपासून बदलापुरातील रिक्षा सेवाही बंद ठेवण्यात आल्या आहे.
या प्रकरणातील आरोपी अटकेत असला तरी पोलीस प्रशासनासह शाळेतील व्यवस्थापनावरही सवाल उपस्थित केला जात आहे. शाळेकडून या प्रकरणात कारवाई करण्यात आली असून शाळेतील सीसीटीव्ही तपासण्याची जबाबदारी असलेल्या मुख्याध्यापिकांना निलंबित करण्यात आलं असून ज्या वर्गात या चिमुकल्या मुली शिकत होत्या. त्या वर्गाच्या वर्गशिक्षिका आणि लहान मुलींना प्रसाधनगृहात नेआण करण्याची जबाबदारी असलेल्या आया यांना थेट नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे.
नक्की वाचा - चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी बदलापूरकर संतप्त; शाळेच्या गेटवर पालकांसह नागरिकांना रोखलं
पालकांचा संताप का?
- घटना समोर आली तेव्हा शाळेच्या संचालक मंडळाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला
- शाळेची बदनामी होईल या भीतीने संचालक मंडळाने काही कारवाई केली नाही असा पालकांचा आरोप
- संचालक मंडळातील काही पदाधिकाऱ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही पालकांचा आरोप
- शाळा प्रशासन निवेदन घ्यायला समोर येत नसल्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत.
- कारवाई करण्यास दिरंगाई केल्याप्रकरणी संचालक मंडळ आणि मुख्याध्यापकांवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world