Badlapur BMW car accident : बदलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बदलापुरातील मुंबई-बडोदा महामार्गावर एका BMW कारचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. BMW कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघातानंतर काही व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओनुसार, अपघातापूर्वी कारचा स्पीड तब्बल २५१ पर्यंत पोहोचल्याचं सांगितलं जात आहे.
वाढदिवसाची पार्टी करून बदलापूरला परताना भयंकर घडलं...
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी २१ जूनच्या पहाटे हा अपघात घडला. ही BMW कार टिटवाळ्याहून बदलापुरच्या दिशेने येत होती. त्यावेळी कारचा स्पीड तब्बल २५१ किमी/तास इतका होता. एरंजाडजळ चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ही गाडी डिव्हायडरला धडकली. यानंतर गाडी अनेकदा पलटी झाल्याचं सांगितलं जात आहे. यानंतर कारमधील एक तरुणीच्या मृतदेहाचे अवयव ५०० मीटर लांबपर्यंत उडाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या अपघातात मृत्यू झालेले दोघेही बदलापुरातील असल्याची माहिती आहे.
योगेश दिघे आणि रिकेबा जॅकप या दोघांचा जागीच मृत्यू झाले आनंद नावाचा एक तरुण गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर ठाण्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. शनिवारी वाढदिवसाची पार्टी करून हे सर्व बदलापूरला परत येत असताना ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झालीय. पुढील तपास पोलीस करत आहेत. काहींच्या मते चालक मद्याच्या अमलाखाली होता. अद्याप पोलिसांकडून याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world