निनाद करमरकर, बदलापूर
Badlapur Railway Station : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांना भरउन्हात बाहेर फिरताना अनेक प्रकारे काळजी घ्यावा लागत आहे. मात्र रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे बदलापूरकरांच्या डोक्याला ताप झाला आहे. बदलापूर रेल्वे स्थानकाच्या होम प्लॅटफॉर्मवरील तिकीट खिडकी उन्हात असल्याने प्रवाशांना तळपत्या उन्हात उभं राहून तिकीट काढावं लागत आहे.
(NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बदलापूर पश्चिमेकडील प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी उन्हात उभं राहावं लागतंय. बदलापूर शहरातील तापमानाचा पार चाळीशी पार गेला आहे. त्यात ही तिकीट खिडकी उन्हात असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागत आहे.
(नक्की वाचा - ATM Withdrawal : एटीएममधून पैसे काढणे महागले; 1 मे पासून नवा नियम लागू)
काही दिवसांपूर्वी बदलापूर रेल्वे स्थानकावरील पश्चिमेकडील तिकीट खिडकी तोडण्यात आली आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात ही तिकीट खिडकी होम प्लॅटफॉर्मवर हलवण्यात आली आहे. मात्र सध्या उन्हाचा पारा बघता इथे किमान शेडची व्यवस्था तरी करावी, अन्यथा ही तिकीट खिडकी सावलीत ठेवण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
(नक्की वाचा- MHADA Offer : म्हाडाची 'बुक माय होम' भन्नाट ऑफर, नागरिकांना आवडेल ते घर खरेदीची संधी)
एकीकडे अनेक भागातं सिग्नवर थांबलेल्या वाहनचालकांचा त्रास कमी व्हावा म्हणून तिथे शेड तयार करण्यात आले आहे. मात्र बदलपुरातील नागरिकांना सावली सोडून उन्हात उभं राहावं लागतं आहे. रेल्वे प्रशासन नागरिकांची ही अडचण दूर करणार का हे पाहावं लागेल.