जाहिरात

Badlapur : बदलापूरकरांना मोठा दिलासा, रेल्वे स्टेशनवरील 'ती' अडचण दूर 'NDTV मराठी' च्या बातमीचा दणका

Badlapur News : बलापूरमधील प्रवाशांची व्यथा NDTV मराठीने समोर आणल्यानंतर रेल्वेनं त्याची दखल घेतली आहे.

Badlapur : बदलापूरकरांना मोठा दिलासा, रेल्वे स्टेशनवरील 'ती' अडचण दूर 'NDTV मराठी' च्या बातमीचा दणका
बदलापूर:

निनाद करमकर, प्रतिनिधी

मुंबई लोकलमधून रोज लाखो प्रवाशी प्रवास करतात. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर रेल्वे हे रेल्वेचे प्रमुख मार्ग आहेत. त्यामधील मध्य रेल्वेचा मार्ग हा प्रवाशांनी जास्त गजबजलेला मानला जातो. या मार्गावर लांब पल्ल्याच्या लोकल तसंच अनेक एक्स्प्रेस धावतात. त्यामधून रेल्वेला मोठा महसूल देखील प्राप्त होतो.

मुंबईची लोकसंख्या वाढत गेली तसं अनेक जण उपनगरात राहू लागले. त्यामधून उपनगरातील लोकल स्टेशनचा विस्तार झाला. मुंबई प्रमाणेच ठाणे जिल्ह्यातही आता अनेक महत्त्वाची लोकल स्टेशन आहेत. तिथं नेहमी प्रवाशांची गर्दी असते. बदलापूर हे ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनमधील प्रवाशांना एक त्रास सहन करावा लागत होता. 'NDTV मराठी' प्रवाशांची व्यथा मांडल्यानंतर रेल्वे प्रशासनानं त्याची तातडीनं दखल घेतली आणि त्यांचा हा त्रास दूर झाला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बदलापूर रेल्वे स्टेशनमधील तिकीट खिडकीवर रेल्वे प्रशासनानं अखेर शेड उभारलंय. हे शेड नसल्यानं प्रवाशांना रणरणत्या उन्हात रांगा लावून तिकिटं काढावी लागत होती. प्रवाशांची ही व्यथा NDTV मराठीने समोर आणल्यानंतर रेल्वेनं त्याची दखल घेत हे शेड उभारलं.

बदलापूर रेल्वे स्टेशनच्या पश्चिम भागातली जुनी तिकीट खिडकी तोडण्यात आल्यानं होम प्लॅटफॉर्मवरच एका केबिनमध्ये तात्पुरती तिकीट खिडकी सुरू करण्यात आली होती. परंतु ही केबीन उन्हात ठेवण्यात आल्यानं रेल्वे कर्मचाऱ्यांना त्रास होत होता, तर शेड नसल्यानं प्रवाशांनाही उन्हात उभं राहावं लागत होतं. ही बाब NDTV मराठीने समोर आणल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तिकीट खिडकीसमोर शेड उभारलं असून यामुळं प्रवाशांना दिलासा मिळालाय.

( नक्की वाचा : IPL Cricketer : मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूला गंभीर आरोपाखाली अटक, मैत्रिणीनेच केली होती तक्रार )

काही दिवसांपूर्वी बदलापूर रेल्वे स्थानकावरील पश्चिमेकडील तिकीट खिडकी तोडण्यात आली आहे. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात ही तिकीट खिडकी होम प्लॅटफॉर्मवर हलवण्यात आली आहे. मात्र सध्या उन्हाचा पारा बघता इथे किमान शेडची व्यवस्था तरी करावी, अन्यथा ही तिकीट खिडकी सावलीत ठेवण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली होती. प्रवाशांची ही व्यथा मांडणारं वृत्त NDTV मराठीनं प्रसिद्ध केलं होतं.

एकीकडे अनेक भागातं सिग्नवर थांबलेल्या वाहनचालकांचा त्रास कमी व्हावा म्हणून तिथे शेड तयार करण्यात आले आहे. मात्र बदलपुरातील नागरिकांना सावली सोडून उन्हात उभं राहावं लागतं होतं. त्यामुळे बदलापूरकर त्रस्त झाले होते. आता त्यांना अखेर दिलासा मिळालाय. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: