जाहिरात

Badlapur News : बदलापूर स्त्रीबीज विक्री प्रकरणात 300 हून अधिक महिलांचं शोषण; राज्याबाहेरील कनेक्शन उघड

Badlapur Egg Donation Racket : हे रॅकेट केवळ बदलापुरापर्यंत सीमित नसून याचे धारेदोरे दुसऱ्या राज्यातही पसरल्याची माहिती आहे.

Badlapur News : बदलापूर स्त्रीबीज विक्री प्रकरणात 300 हून अधिक महिलांचं शोषण; राज्याबाहेरील कनेक्शन उघड

अमजद खान, प्रतिनिधी

Badlapur Egg Donation Racket : बदलापुरातील स्त्री बीज विक्री रॅकेट प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या धक्कादायक प्रकरणात प्राथमिक पातळीच्या चौकशीत 40 पीडित महिलांची माहिती समोर आली होती. हा आकडा शेकडोंच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या प्रकरणाचं कनेक्शन आता समोर येत आहे. हे रॅकेट केवळ बदलापुरापर्यंत सीमित नसून याचे धारेदोरे दुसऱ्या राज्यातही पसरल्याची माहिती आहे.

बदलापूर स्त्रीबीज विक्री प्रकरणाचं राज्याबाहेर कनेक्शन...

प्राथमिक तपासानुसार या रॅकेटचे धागेदोरे नाशिक, नागपूर तसेच तेलंगणा आणि बंगळुरूपर्यंत पसरले असल्याची माहिती समोर येत आहे. अटक करण्यात आलेल्या तिन्ही महिलांच्या मोबाइलमध्ये या कनेक्शनचे पुरावे सापडले आहेत. या रॅकेटअंतर्गत सुमारे ३०० हून अधिक महिलांचे शोषण झाले असून काही मोठी रुग्णालये आणि डॉक्टरांचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाणे आणि उल्हासनगरमधील दोन रुग्णालयांमध्ये महिलांची सोनोग्राफी केली जात होती.

नीलम गोऱ्हेचं पोलीस महासंचालकांना निवेदन

महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बदलापूर येथे उघडकीस आलेल्या महिलांच्या स्त्रीबीज (Oocytes) विक्री रॅकेट प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे महाराष्ट्र पोलीस महासंचालकांना निवेदन दिले आहे. बदलापूर येथील जोवेली परिसरात पोलीस कारवाईदरम्यान आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या महिलांना लक्ष्य करून त्यांच्या शरीरातून कृत्रिमरित्या बीजांड काढून त्यांची बेकायदेशीर विक्री करणारे संघटित रॅकेट उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेला मानवी तस्करीचा आणि महिलांच्या प्रजनन अधिकारांवरील गंभीर आघाताचा स्वरूप असल्याचे त्यांनी नमूद केले.

नक्की वाचा - Badlapur Egg Donation : Egg डोनेशन महिलांसाठी किती धोकादायक? बदलापुरातील भयंकर प्रकरणानंतर नवा मुद्दा चर्चेत

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, यापूर्वीही त्यांनी विधानपरिषदेत सरोगसी प्रक्रियेतील महिलांच्या शारीरिक शोषणाबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. तसेच महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी चंद्रशेखर धर्माधिकारी समितीने दिलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याची मागणी सातत्याने केली होती. बदलापुरमधील घटना ही त्या शिफारशींच्या उल्लंघनाचे उदाहरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्त्री आधार केंद्र च्या माध्यमातून महिलांच्या हक्कांसाठी काम करताना अशा प्रकारच्या घटनांविरोधात कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या निवेदनाद्वारे डॉ. गोऱ्हे यांनी या गुन्ह्याच्या आंतरराज्यीय स्वरूपाचा विचार करून तातडीने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com