जाहिरात

भिवंडीत महापौर पदावरून काँग्रेसमध्ये फूट! भाजप बंडखोराला पाठिंबा दिल्याने जिल्हाध्यक्ष आक्रमक

Bhiwandi Mayor Election: भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उद्या, शुक्रवारी मतदान होत आहे. मात्र, या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

भिवंडीत महापौर पदावरून काँग्रेसमध्ये फूट! भाजप बंडखोराला पाठिंबा दिल्याने जिल्हाध्यक्ष आक्रमक

Bhiwandi mayor Election: भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचे समोर आले आहे. काँग्रेसने आपले संख्याबळ जास्त असूनही भाजपच्या बंडखोर उमेदवाराला महापौर पदासाठी पाठिंबा दिल्याने स्थानिक नेत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी उद्या, शुक्रवारी मतदान होत आहे. मात्र, या निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपचे बंडखोर नेते नारायण चौधरी यांना 'भिवंडी सेक्युलर फ्रंट'तर्फे महापौर पदाची उमेदवारी जाहीर केल्याने स्थानिक पदाधिकारी संतप्त झाले आहेत.

काय आहे वादाचे मुख्य कारण?

भिवंडी महापालिकेच्या 90 जागांपैकी काँग्रेसने 30 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. त्यांची मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडे 12 जागा आहेत. बहुमतासाठी 46 जागांची गरज असताना, काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीने भाजपच्या 9 बंडखोर नगरसेवकांना सोबत घेतले आहे. काँग्रेसकडे सर्वाधिक जागा असूनही महापौर पद स्वतःकडे न ठेवता भाजपच्या बंडखोराला का दिले? असा सवाल स्थानिक नेत्यांनी उपस्थित केला आहे.

(नक्की वाचा -  Ladki Bahin Yojana: फॉर्ममधील एक प्रश्न अन् लाखो महिला अपात्र! लाडकी बहीण लाभार्थ्यांची संख्या 86 लाखांनी घटली)

जिल्हाध्यक्षांची राहुल गांधींकडे तक्रार

भिवंडी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल रशीद ताहीर मोमीन यांनी थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. "प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांच्याशी संगनमत करून पक्षाचे हित डावलले आहे. काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ असताना भाजपशी संबंधित उमेदवारासमोर शरणागती पत्करली," असा आरोप मोमीन यांनी केला आहे.

(नक्की वाचा- Pune News: पुण्यात 'मुले पळवणारी टोळी' सक्रिय? पुणे पोलिसांचे नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी)

पर्याय उपलब्ध होता 

अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांच्या मदतीने काँग्रेसचाच महापौर होऊ शकला असता, पण आपल्याला तसे करण्यापासून रोखले गेले, असेही मोमीन यांनी पत्रात नमूद केले आहे.

दुसरीकडे, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षाची बाजू सावरताना सांगितले की, काँग्रेसने भाजप किंवा शिवसेनेशी कोणतीही तडजोड केलेली नाही. भाजपचे नगरसेवक स्वतःहून पक्ष सोडून सेक्युलर फ्रंटमध्ये सामील झाले आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com