जाहिरात

Nagpur News : नागपुरात चोरी केलेल्या बाईक मध्य प्रदेशमध्ये विकायचे; दोन भावांना अटक

Nagpur News : 43 वर्षांचे वय असलेला राहुल नागपुरातील एखाद्या लॉजमध्ये राहायचा आणि दुचाकी वाहन चोरी करत असे आणि 37 वर्षीय दिनेश ते वाहन नेऊन विकत असे.

Nagpur News : नागपुरात चोरी केलेल्या बाईक मध्य प्रदेशमध्ये विकायचे; दोन भावांना अटक

Nagpur News : नागपुरात पार्क केलेल्या मोटारसायकली चोरून मध्यप्रदेशात विकणाऱ्या दोन भावांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. दोन भावांच्या अटकेनंतर मोटर सायकल चोरीचे तब्बल 43 गुन्हे उघडकीस आले आहेत. नागपूर पोलीस गुन्हे शाखेद्वारे दोन्ही भावांकडून चोरीच्या एकूण तब्बल 31 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण अंदाजे किंमत 19 लाखांवर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

तसेच या दोघांनी चोरून विकलेल्या आणखी 12 मोटार सायकलींचा देखील छडा लागला आहे. अशा प्रकारे या दोघा भावांच्या अटकेनंतर एकूण 43 मोटर सायकली चोरी गुन्ह्यांची उकल नागपूर पोलिसांकडून झाली आहे. राहुल ठाकरे आणि दिनेश ठाकरे अशी त्यांची नावे आहेत. 

(नक्की वाचा-  Sudhakar Badgujar Joins BJP : दूध का दूध और पानी का पानी होगा! ठाकरेंना बडगुजरांचा इशारा)

43 वर्षांचे वय असलेला राहुल नागपुरातील एखाद्या लॉजमध्ये राहायचा आणि दुचाकी वाहन चोरी करत असे आणि 37 वर्षीय दिनेश ते वाहन नेऊन विकत असे. नागपूर येथून मोटर सायकल चोरताच आधी त्याची नंबर प्लेट बदलून टाकायचे आणि मग मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील सातनेर येथे नेऊन शेतकरी आणि शेतमजुरांना कमी किंमतीत विकत होते. दोघांकडून या आधी केलेले आणखी अशाच स्वरूपाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com