जाहिरात

Sudhakar Badgujar Joins BJP : दूध का दूध और पानी का पानी होगा! ठाकरेंना बडगुजरांचा इशारा

"मंत्री गिरीश महाजन खऱ्या अर्थाने संकटमोचक आहेत. त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थानाचं काम आहे. आपत्ती आली तर ते मार्ग काढतात", असं म्हणत सुधाकर बडगुजर यांनी गिरीश महाजनांचे कौतुक केले.  

Sudhakar Badgujar Joins BJP : दूध का दूध और पानी का पानी होगा! ठाकरेंना बडगुजरांचा इशारा
मुंबई:

आगामी पालिका निवडणुकीसाठी सर्व पक्ष मोर्चेबांधणीला लागले आहेत. प्रत्येक पक्षात जास्तीत जास्त इन्कमिंग कसं होईल याची काळजी घेतली जात आहे.  नाशिक जिल्ह्यातील एक महत्वाचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुधाकर बडगुजरांनी मंगळवारचा दिवस गाजवला. त्यांनी भाजपमधून विरोध होत असतानाही भाजपमध्ये प्रवेश केला. (Sudhakar Badgujar Joins BJP) यामुळे नाशिकच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होऊ लागली आहे. नाशिक जिल्ह्यातील राजकारणाचा एक महत्वाचा चेहरा आणि कालपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेचे विश्वासू कार्यकर्ते असलेल्या सुधाकर बडगुजर यांनी मंगळवारी (17 जून 2025)  भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करताच बडगुजर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला इशारा दिला.

ठाकरेंना इशारा. 

मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणारे सुधाकर बडगुजर हे एकटे नव्हते. त्यांच्यासोबत बरेच कार्यकर्ते आणि माजी महापौरही भाजपमध्ये सामील झाले. नव्या पक्षात पाूल ठेवताच बडगुजर यांनी आपल्या जुन्या पक्षावर सडकून टीका करण्यास सुरुवात केली. आगामी महापालिका निवडणुकीमध्ये 'दूध का दूध और पानी का पानी होगा' असा फिल्मी डायलॉग मारत बडगुजरांनी ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचले. 

ठाकरेंची साथ सोडण्याचे सांगितले कारण

पक्षप्रवेशावेळी भाषण करत असताना कोरोना काळातील एक आठवण बडगुजर यांनी सांगितली. कोविड काळात नाशिकमध्ये दिवस रात्र झटून सुद्धा माझ्यावर पक्षाने अविश्वास दाखवला आणि तेव्हा पासूनच नाराजीची सुरुवात झाली. भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्यावर कोणताही दबाव नसल्याचंही त्यांनी म्हटले.  

"मी खरंच निष्पाप आहे.समाजासाठी झटतो. कोरोना काळात कोविड सेंटर उभं केलं. पक्षासाठी अथक परीश्रम घेतले.  पण अचानक नियतीने घाला घातला आणि माझ्यावर कारवाई झाली. ज्या पक्षाने माझा अनादर केला, त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिका निवडणुकीत दूध का दूध और पानी का पानी होगा", अ

गिरीश महाजन खरे संकटमोचक

"मंत्री गिरीश महाजन खऱ्या अर्थाने संकटमोचक आहेत. त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थानाचं काम आहे. आपत्ती आली तर ते मार्ग काढतात", असं म्हणत सुधाकर बडगुजर यांनी गिरीश महाजनांचे कौतुक केले.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com