Cabinet Expansion: भाजपकडून या माजी मंत्र्यांचा पत्ता कट? मंत्रिपदासाठी अद्याप वरिष्ठांचा फोन नाही

मंत्रिमंडळात यंदा अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली गेल्याच समोर आलं आहे. तर अनेक माजी मंत्र्यांवर पुन्हा विश्वास पक्षाने टाकला आहे. भाजपकडून अजूनही काही माजी मंत्री शपथविधीसाठी वरिष्ठांच्या फोनच्या प्रतिक्षेत आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

नागपूरमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यापार्श्वभूमीवर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन यायला सुरुवात झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मंत्रिमंडळात यंदा अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली गेल्याच समोर आलं आहे. तर अनेक माजी मंत्र्यांवर पुन्हा विश्वास पक्षाने टाकला आहे. भाजपकडून अजूनही काही माजी मंत्री शपथविधीसाठी वरिष्ठांच्या फोनच्या प्रतिक्षेत आहेत. 

भाजपाकडून संजय कुटे, रवींद्र चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, गणेश नाईक यांना अद्याप मंत्रिपदासाठी कोणताही फोन आलेला नाही. त्यामुळे या माजी मंत्र्यांचा पत्ता कट होणार की काय अशी चर्चा सुरु झाला आहे. 

(नक्की वाचा-  शिंदेंचे मंत्रिमंडळातील शिलेदार ठरले; शिवसेनेकडून हे आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार, 3 मंत्र्यांना डावललं)

कोणत्या आमदारांना मंत्रिपदासाठी फोन?

भाजकडून गिरीश महाजन, नितेश राणे,  शिवेंद्रराजे भोसले,  जयकुमार रावल, मंगलप्रभात लोढा, पंकजा मुंडे. चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, पंकज भोयार, यांना संपर्क करण्यात आला आहे.

Advertisement

(नक्की वाचा- Narhari Zirwal : सरपंच, आमदारकीची हॅटट्रिक आता मंत्री... नरहरी झिरवाळ यांची राजकीय कारकीर्द)

शिवसेनेकडून आतापर्यंत उदय सामंत, शंभूराज देसाई,  गुलाबराव पाटील, प्रकाश आबीटकर,  आशिष जैस्वाल, संजय शिरसाट,  भरत गोगावले या नेत्यांना आजच्या शपथविधी सोहळ्यासाठी फोन करण्यात आले आहेत. 

तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनिल पाटील, नरहरी झिरवळ, अदिती तटकरे, इंद्रनील नाईक, हसन मुश्रीफ, दत्ता भरणे यांना मंत्रिपदासाठी फोन करण्यात आला आहे. 

Advertisement