पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का, पुन्हा एका माजी आमदाराचा राजीनामा

गोपालदास अग्रवाल हे पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याचे संकेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपमध्ये अस्वस्थ होते. अखेर आज पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. 

Advertisement
Read Time: 2 mins

तेजस मोहातुरे, गोंदिया

पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांना पक्षाचा राजीनामा दिला आहे. अग्रवाल हे काँग्रेसकडून 3 वेळा विधानसभा व 2 वेळा विधानपरिषद सदस्य राहिले आहे. गोंदिया विधानसभा येथील माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकी दरम्यान काँग्रेसमधून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मात्र गोपालदास अग्रवाल हे पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याचे संकेत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपमध्ये अस्वस्थ होते. अखेर आज पत्रकार परिषद घेत त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. 

(नक्की वाचा -  "बारामतीकरांना मी सोडून दुसरा आमदार मिळाला पाहिजे", अजित पवार असं का म्हणाले?)

गेल्या अनेक दिवसांपासून ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र, आता दिल्लीवरून त्यांच्या पक्ष प्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती आहे. गोपालदास अग्रवाल यांनी 2019 निवडणुकीदरम्यान मोदी लाटेत भाजप प्रवेश केला होता. त्यांना भाजपने उमेदवारीही दिली होती. मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते भाजपात अस्वस्थ होते. अखेर त्यांनी आज भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून काँग्रेसमध्ये घरवापसी करणार असल्याची माहिती दिली आहे. 

(नक्की वाचा - केज मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? राखीव मतदार संघात कोण बाजी मारणार?)

विशेष म्हणजे दोन महिन्यापूर्वीच माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा एक माजी आमदाराने भाजपला सोडचिट्टी दिल्याने पूर्व विदर्भात भाजपला मोठा धक्का समजला जात आहे. विशेष म्हणजे गोपाल अग्रवाल यांच्या पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसचे आमदार सहसराम कोरोटे, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष दिलीप बनसोड, काँग्रेस पदाधिकारी यांची उपस्थित असल्याने ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार हे मात्र निश्चित झाले आहे.

Advertisement
Topics mentioned in this article