मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी ईडीबाबत केलेल्या वक्तव्याला भाजपाकडून उत्तर देण्यात आलं आहे. गजानन कीर्तिकर यांचे पूत्र अमोल कीर्तिकर यांची कथित खिचडी घोटाळा प्रकरणात ईडीकडून चौकशी सुरु आहे. अमोल कीर्तिकर ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाचे उमेदवार आहेत. ईडीनं सुरु केलेल्या चौकशीमुळे त्यांच्यावर सध्या अटकेची टांगती तलवार आहे. मुलाची ईडीकडून होत असलेल्या चौकशीवर गजानन कीर्तिकर यांनी पत्रकार परिषद घेऊन नाराजी व्यक्त केली.
'
गजानन कीर्तिकर यांचं शरीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत तर आत्मा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत आहे, असं उत्तर साटम यांनी सोशल मीडिया हँडल X वर पोस्ट करत दिलं आहे.
अमित साटम यांनी गजानन कीर्तिकरांवर निशाणा साधणारी पोस्ट X वर केली आहे. से वाटते की, गजानन कीर्तिकर यांचे शरीर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या बरोबर आहे आणि आत्मा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सोबत आहे. एकदा त्यांनी ठरवावे की ते कुणाबरोबर आहे. मोदींचा चेहरा वापरून भाजप कार्यकर्त्यांच्या जीवावर दोनदा खासदार झाले.
ईडी पासून घाबरण्याची गरज भ्रष्टाचाऱ्यांना आहे.जर कर नाही तर डर कशाला? यांच्या अकाउंट मध्ये खिचडीच्या कंत्राटदाराकडून 95 लाख रुपये आलेच का? याचे उत्तर द्यावे! भ्रष्टाचारियो की खैर नही! कार्यवाही तो होगी ही!!! अशी पोस्ट साटम यांनी केलीय. या पोस्टमध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही टॅग करत त्यांचं या प्रकरणाकडं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय.
असे वाटते की, गजानन कीर्तिकर यांचे शरीर मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या बरोबर आहे आणि आत्मा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सोबत आहे. एकदा त्यांनी ठरवावे की ते कुणाबरोबर आहे. मोदींचा चेहरा वापरून भाजप कार्यकर्त्यांच्या जीवावर दोनदा खासदार झाले.
— Ameet Satam (Modi Ka Parivar) (@AmeetSatam) April 12, 2024
ईडी पासून घाबरण्याची…
काय म्हणाले होते कीर्तिकर?
अमोल कीर्तिकर यांची ईडीकडून सुरु असलेल्या चौकशीवर गजानन कीर्तिकर यांनी नाराजी व्यक्त केली होती. 'अमोल कीर्तिकर आणि सूरज चव्हाण यांच्यावर खिचडी गैरव्यवहाराचा आरोप आहे.करोना आला त्यावेळी संजय माशेलकर यांनी एक कंपनी स्थापन केली. त्यामध्ये सप्लायचे काम अमोल किर्तीकर आणि सूरज चव्हाण करत होते. त्यांना मिळालेलं मानधन त्यांनी बँकेत टाकलं.
महायुतीत रत्नागिरीचा उमेदवार कोण? राणेंनी उमेदवाराचे नाव घेतले, तिढा वाढणार?
या प्रकरणात कुठेही मनी लाँड्रीग झालेली नाही. या प्रकरणाची चौकशीही संपली. पण, त्यानंतरही त्यांना बोलावलं जातं आणि टेन्शन दिलं जातं. हे ईडीचे प्रयोग बंद केले पाहिजेत,' अशी मागणी कीर्तिकर यांनी केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world