राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या राम शिंदे यांचा अवघ्या 1243 मतांना पराभव केला. दरम्यान आज अजित पवार-रोहित पवार यांची भेट झाली. त्यावेळी थोडक्यात वाचलास. माझी एखादी सभा झाली असती तर काय झालं असतं? असा टोला अजित पवारांनी रोहित पवारांना लगावला. यावरुन आता राम शिंदे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. यावेळी राम शिंदे यांची डोळे देखील पाणावले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अजित पवार आणि रोहित पवार हे एकच आहेत. दोघांनी एकत्रित एकमेकांना पूरक भूमिका घेतल्या आहेत. अजित पवारांनी जाणूनबुजून माझ्या मतदारसंघात सभा घेतली नाही. रोहित पवार यांना मदत व्हावी म्हणून अजित पवार यांनी सभा घेणे टाळले, असा आरोप भाजपचे कर्जत जामखेडचे उमेदवार राम शिंदे यांनी केला आहे.
(नक्की वाचा- VIDEO : "थोडक्यात वाचलास, दर्शन घे दर्शन", अजित पवारांचा रोहित पवारांना मिश्किल टोला)
अजित पवारांना वारंवार सभा घ्यावी यासाठी विनंती केली. पण अजित पवार यांनी मुद्दाम सभा घेतली नाही. रोहित पवार यांचे मतदान असणाऱ्या बारामतीत केंद्रावर अजित पवारांना मतदान त्यांच्या परिवाराने केले आहे. रोहित पवारांनी अजित पवार हे एकत्र आहे, असंही राम शिंदे यांनी म्हटलं आहे.
(नक्की वाचा - एकटा पडला 'राजा', इंजिन धोक्यात; आज मनसेची महत्त्वपूर्ण बैठक)
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र राम शिंदे यांचे आरोप फेटाळले. राम शिंदे यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नाही. तसं असेल तर सुनील टिंगरे यांना वाटतं तिथे काहींनी काम केले नाही. पण मला वाटते महायुतीला जे यश मिळालं आहे, ते सर्वांनी मेहनत घेतली त्यातून मिळालं आहे, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं.
रोहित पवारांचा अटीतटीच्या लढतीत विजय
रोहित पवार यांचा यंदात विजय सोपा नव्हता. अत्यंत अटीतटीच्या लढतीत रोहित पवारांनी अवघ्या 1243 मतांना आपला विजय साजरा केला. रोहित पवार यांना 1 लाख 27 हजार 676 मते मिळाली. तर भाजपचे राम शिंदे यांना 1 लाख 26 हजार 433 मते मिळाली.