Ravindra Chavan: भाजपा आणि मराठी माणूस वेगळे नाहीतच; रविंद्र चव्हाण यांनी मांडली भाजपची मराठी विचारधारा

रविंद्र चव्हाण यांनी मराठी भाषेचे राजकारणच करू नका कारण हा विषामृत असा खेळ नाही. विरोधकांची मराठी बाबतची भूमिका ही नकारात्मकतेने भरलेली असून ज्ञानेश्वर माऊलींच्या "विश्वात्मके देवे" या वैश्विक तत्त्वाशी त्यांची बांधिलकी नसल्याचे प्रतीक आहे असे ते म्हणाले.

जाहिरात
Read Time: 2 mins

Ravindra Chavan: भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पक्षाची मराठी भाषेबाबतची भूमिका अधिक स्पष्ट करत विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. "भाजपाची विचारधारा ही मराठी माणसाने स्थापन केलेल्या मातृसंस्थेतून आली असल्याचे रविंद्र चव्हाण यांनी म्हटलं. महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पक्षाच्या सांस्कृतिक आणि भाषिक भूमिकेचे जोरदार समर्थन केले आहे.

भाजपचे मराठी म्हणजे मराठी व्याकरणातल्या अनेकवचन प्रकारासारखे आहे. मराठी भाषेबाबतचा आमचा दृष्टिकोन "आम्ही आपले आपण" असा अनेकवचनी आणि व्यापक असून त्यात मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता यांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं मराठी सकारात्मकता पसरवणारे आहे ज्यातून मराठी भाषा साहित्य संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार अपेक्षित आहे असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले. 

(नक्की वाचा-  What is PADU: काय आहे 'पाडू'? मुंबई महापालिका निवडणुकीत पहिल्यांदाच होणार वापर)

मराठी भाषेचे राजकारणच करू नका 

विरोधकांवर कडक शब्दांत टीका करताना  रविंद्र चव्हाण यांनी मराठी भाषेचे राजकारणच करू नका कारण हा विषामृत असा खेळ नाही. विरोधकांची मराठी बाबतची भूमिका ही नकारात्मकतेने भरलेली असून ज्ञानेश्वर माऊलींच्या "विश्वात्मके देवे" या वैश्विक तत्त्वाशी त्यांची बांधिलकी नसल्याचे प्रतीक आहे असे ते म्हणाले.

भाजप मराठी महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित 

भाजप आणि मराठी माणूस या दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीतच. वास्तविकपणे मराठी माणसाने स्थापन केलेल्या मातृसंस्थेची विचारधारा हीच भाजपाची विचारधारा असून घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे या तीनही मराठी भाषिक थोर व्यक्तींच्या विचारांनी प्रेरित देश आणि समाज घडविण्याचे काम भाजपा वर्षानुवर्षे करत आहे असे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले. 

Advertisement

(नक्की वाचा- Holiday News: राज्यातील 29 शहरांमध्ये 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; वाचा शहरांची संपूर्ण यादी)

भाजपने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला

केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगात राहणाऱ्या मराठी भाषिकांच्या उन्नतीसाठी भाजपा कटिबद्ध असून राज्याची प्रगती, राज्यातील नागरिकांचं जीवन अधिक सुसह्य व्हावं, देशभक्त आणि संस्कारित पिढी तयार व्हावी यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करूया अशी पुस्ती त्यांनी जोडली. भाजपाने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला आणि जगभर साजरा होणारी गुढी पाडवा शोभायात्रा भाजपा कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून प्रथम सुरु झाली हेच आमचे मराठी भाषेबाबतचे अनेकवचन असल्याचा पुनरुच्चार प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केला.