जाहिरात

मुंबई महापालिकेचा तुर्कीला दणका; पाकिस्तानची बाजू घेणे पडलं महागात

तुर्कीकडून रोबोटिक लाईफबॉय खरेदी करण्याची योजना बीएमसीने रद्द केली आहे. समुद्रात बुडणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी ही उपकरणे वापरण्यात येणार होती. 

मुंबई महापालिकेचा तुर्कीला दणका; पाकिस्तानची बाजू घेणे पडलं महागात
  • Mumbai's civic body has scrapped a tender with a company based in Turkey
  • The tender aimed to purchase six robotic rescue vehicles for helping lifeguards
  • The equipment was to be sourced from Turkish company Maren Robotics
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' राबवलं होतं. पाकिस्तानात घुसून भारतीय लष्कराने दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.  दरम्यान पाकिस्तानची बाजू घेतल्यामुळे तुर्कीवर सातत्याने देशातून टीका होत होती. तुर्कीसोबतच्या आर्थिक संबंधांवरही त्याचा परिणाम झाला होता. आता मुंबई महापालिकेने तुर्की कंपनीकडून समुद्रकिनारी सुरक्षा उपकरणे खरेदी करण्यासाठीची महत्त्वाची निविदा रद्द केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

गिरगाव चौपाटी, दादर शिवाजी पार्क, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई यासह किनारी शहरातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षकांना मदत करण्यासाठी सहा रोबोटिक वॉटर रेस्क्यू वाहने खरेदी करण्यासाठी गेल्या सप्टेंबरमध्ये निविदा काढण्यात आली होती.  तुर्कीकडून रोबोटिक लाईफबॉय खरेदी करण्याची योजना बीएमसीने रद्द केली आहे. समुद्रात बुडणाऱ्या लोकांना वाचवण्यासाठी ही उपकरणे वापरण्यात येणार होती. 

या रोबोटिक लाईफबॉयमध्ये दोन वॉटर जेट, 10000 mAh बॅटरी आणि 200 किलो वजन उचलण्याची क्षमता होती. समुद्रात 800 मीटर पर्यंत जाऊ शकतात आणि 18 किमी प्रति तास वेगाने चालू शकतात. तुर्की कंपनी मारेन रोबोटिक्सकडून उपकरणे घेतली जाणार होती. मात्र मुंबई महापालिकेने ही निविदा रद्द केल्याची माहिती आहे. 

(नक्की वाचा-  Crime News : आंबे चोरीच्या संशयावरून शेतमजूराची बेदम मारहाण करत हत्या, 5 जणांना अटक)

तुर्कीला भारताचा दणका

भारताचा शत्रू पाकिस्तानशी मैत्री करणे तुर्कीला खूप महागात पडत आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या उघड समर्थनामुळे भारतीयांनी तुर्कीच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकला आहे. देशातील डझनभराहून अधिक मोठ्या बाजारपेठांनी तुर्कीच्या सफरचंदांसह सर्व फळांवर पूर्णपणे बहिष्कार टाकला, ज्यामुळे तुर्कीला मोठा धक्का बसला आहे.

(नक्की वाचा - Chhatrapati Sambhajinagar : प्रेमाची शिक्षा केवळ दु:ख अन् छळ; माहेरून पैसे आण म्हणत विवाहितेला दोरीने बांधून शरीरावर चटके)

गेल्या वर्षी, तुर्कीमध्ये सुमारे 3 हजार कोटी रुपये खर्च करणाऱ्या अर्ध्याहून अधिक भारतीय पर्यटकांनी तुर्कीला भेट देण्याचे प्लॅन रद्द केले, ज्यामुळे तुर्कीला हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. याशिवाय, आयआयटी बॉम्बे, जामिया, चंदीगड विद्यापीठ आणि जेएनयू सारख्या देशातील मोठ्या शैक्षणिक संस्थांनी तुर्कीसोबतचे करार रद्द केले आहेत. ज्यामुळे तेथील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com