Mumbai News : मुंबईत हॉटेलमधील जेवणातून रोटी गायब होणार? काय आहे कारण?

Mumbai News : भट्टीतील रोटी अनेकजण मोठ्या आवडीने खातात. हॉटेलमध्ये काही भाज्या या तंदूर रोटीसोबतच खाण्याची सवय असते. मात्र ही सवय आता खाद्यप्रेमींना मोडावी लागण्याची शक्यता आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

जगभरातील वाढतं प्रदूषण चिंतेचा विषय बनला आहे. मुंबईतील देखील वायू प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अनेक प्रयत्नानंतरही प्रदूषण रोखण्यसाठी मुंबई महापालिकेला पूर्णपणे यश मिळालेलं नाही. प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. आता मुबंईतील कोळशावरील तंदूर भट्ट्या बंद करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे हॉटेलमधून रोटी गायब होणार की काय अशी चर्चा रंगू लागली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मुंबई महापालिकेने यासाठी 110 हॉटेल्सना नोटीस पाठवल्या आहेत. इलेक्ट्रिक एलपीजी, सीएनजी , पीएनजीचा वापर करणे या हॉटेल्सना अनिवार्य असणार आहेत. 8 जुलैपर्यंत कोळसा भट्टी बंद करण्याचे आदेश महापालिकेने दिले आहे. आदेशांची अमलबजावणी न झाल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे.  

हॉटेलमध्ये गेल्यात सर्रासपणे ऑर्डर केली जाणारी रोटी आता मिळेल की नाही अशी स्थिती आहे. भट्टीतील रोटी अनेकजण मोठ्या आवडीने खातात. हॉटेलमध्ये काही भाज्या या तंदूर रोटीसोबतच खाण्याची सवय असते. मात्र ही सवय आता खाद्यप्रेमींना मोडावी लागण्याची शक्यता आहे. 

(नक्की वाचा- Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...)

मुंबई उच्च न्यायालयाने याबाबत 9 जानेवारीला आदेश दिले होते की, मुंबई महानगरपालिका हद्दीतील लाकूड, कोळसा किंवा इतर पारंपारिक इंधन वापरुन म्हणजे कोळशाच्या तंदूर भट्टीचा वापर करून तंदुरी रोटी बनवणाऱ्या हॉटेल मालकांना आता त्यांच्या हॉटेलमध्ये बदल करावे लागतील. कोळशाच्या भट्टीऐवजी इलेक्ट्रिक, एलपीजी, पीएनजी, सीएनजी आणि इतर हरित ऊर्जा वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

Advertisement

मुंबईतील बेकऱ्याही होणार गायब

मुंबईत पाव आणि इतर बेकरी पदार्थ खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र बेकरी पदार्थंची आवड असणाऱ्या नागरिकांना ही आता आपली सवय मोडवी लागू शकते. कारण लाकडाचा वापर करून बेकरी चालवणाऱ्यांना देखील मुंबई महापालिकेने नोटीस दिली आहे. लाकडाऐवडी सीएनजी, पीएनजी बेकरी चालकांना वापरावे लागणार आहे. 

(नक्की वाचा - Poonam Pandey Video : पुनम पांडेच्या अश्लील व्हिडीओबद्दल आई काय म्हणाली? VIDEO व्हायरल )

मुंबई महापालिकेने नोटीसआणि माहिती दिल्यानंतरही हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबा मालकांनी नियमांचे पालन केले नाहीतर त्यांचा परवाना रद्द केला जाईल. यासोबतच दंड आकारला जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Advertisement
Topics mentioned in this article