Mumbai News : कोस्टल रोड 2 साठी 'हा' पूल पाडणार, मुंबईकरांचे 27 कोटी वाया जाणार

सात वर्षांपूर्वी हा उड्डाणपूल बांधताना भविष्यातील प्रकल्पांचा विचार का केला गेला नाही? यामुळे सार्वजनिक पैशाची उधळपट्टी झाली असे म्हणता येणार नाही का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

 Mumbai News: मुंबई महापालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड 2 प्रकल्प वर्सोवा ते दहिसर यांना जोडणार आहे. मात्र या प्रकल्पासाठी त्याच्या मार्गातील एक महत्त्वाचा अडथळा दूर करण्याची तयारी सुरू झाली आहे. या प्रकल्पांतर्गत गोरेगाव येथील वीर सावरकर उड्डाणपूल तोडण्याचे निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे हा उड्डाणपूल अवघ्या 7 वर्षांपूर्वी 27 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला होता आणि आता तो पाडावा लागणार आहे.

कोस्टल रोड 2 चा उद्देश मुंबईच्या पश्चिम उपनगरांमधील वाहतूक सुकर करणे आणि शहराच्या उत्तर-दक्षिण जोडणीला बळकटी देणे हा आहे. मात्र या विकासासाठी शहरातील विद्यमान उड्डाणपूल आणि रस्त्यांचे नुकसान होत आहे. बीएमसी अधिकाऱ्यांच्या मते, प्रस्तावित कोस्टल रोडचा मार्ग या उड्डाणपुलाखालून जाणार असल्याने आणि अभियांत्रिकी तसेच सुरक्षिततेच्या निकषांनुसार त्याची उपस्थिती प्रकल्पावर परिणाम करू शकते, त्यामुळे हा उड्डाणपूल तोडणे आवश्यक आहे.

( नक्की वाचा: मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर अन् गारेगार; रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांनी दिली मोठी अपडेट )

यामुळे सात वर्षांपूर्वी हा उड्डाणपूल बांधताना भविष्यातील प्रकल्पांचा विचार का केला गेला नाही? यामुळे सार्वजनिक पैशाची उधळपट्टी झाली असे म्हणता येणार नाही का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

(नक्की वाचा-  MG EV Car Accident CCTV: ईव्ही चालवणाऱ्यांनो सावध व्हा! ब्रेक आपोआप निघाला, गाडीचा डेंजर अपघात)

मुंबई महापालिकेकडून पारदर्शकता आणि दीर्घकालीन नियोजनावर भर देण्याची मागणी होत आहे, जेणेकरून अशा पुनरावृत्तीमुळे होणारे नुकसान टाळता येईल. सध्या, उड्डाणपूल तोडण्याची प्रक्रिया औपचारिकपणे सुरू झालेली नाही, परंतु प्रकल्प अहवाल आणि प्रारंभिक योजनांमध्ये हा निर्णय नोंदवला गेला आहे.

Advertisement

Topics mentioned in this article