BMC Affordable Homes: 'म्हाडा'प्रमाणे BMC ची 426 घरांसाठी लॉटरी; पाहा किंमत आणि लोकेशन

BMC Affordable Home Lottery​​​​​​​: मुंबईतील ही 426 घरे मुंबईतील विविध भागांमध्ये उपलब्ध होणार आहेत. ज्यामुळे मुंबईकरांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी घर घेण्याची संधी मिळेल.

जाहिरात
Read Time: 2 mins

BMC Affordable Home Lottery: म्हाडा आणि सिडकोप्रमाणे मुंबई महापालिका देखील सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणाऱ्या घरांसाठी सोडत काढणार आहे. विकास नियंत्रण नियमावलीतील बदलांमुळे 20 टक्के प्रीमियमच्या बदल्यात विकासकांकडून महापालिकेला 426 घरे मिळाली आहेत. या घरांची बीएमसीकडून दिवाळीनंतर लॉटरीद्वारे विक्री केली जाणार आहे. महापालिका पुढील आठवड्यापासून मुंबईकरांकडून या घरांसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात करणार आहे. महापालिकेला या घरांच्या विक्रीतून तब्बल 300 कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

विकास नियंत्रण नियमावलीतील बदलांमुळे, आता चार हजार चौरस मीटरपेक्षा मोठ्या भूखंडांवर बांधकाम करणाऱ्या विकासकांना महापालिकेसाठी 20 टक्के घरे बांधून द्यावी लागणार आहेत. ही घरे अल्प उत्पन्न गट (LIG) आणि अत्यल्प उत्पन्न (EWS) गटासाठी उपलब्ध होणार आहे.

घराचा आकार आणि किंमत

या घरांचा आकार किमान 270 चौरस फूट ते 528 चौरस फूट असणार आहे. या घरांची किंमत 60 लाख रुपयांपासून ते 1 कोटी रुपयांपर्यंत असू शकतात. पुढील सात दिवसांत या घरांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून, जाहिरात व महापालिकेच्या वेबसाईटवर याची सविस्तर माहिती दिली जाईल. मुंबईतील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना हक्काचं घर मिळावं हा यामागील मुख्य उद्देश आहे.

(नक्की वाचा-  Check Your PF Balance: मिस कॉल द्या अन् पीएफ बॅलेन्स तपासा! 'हा' नंबर सेव्ह करून ठेवा)

ही घरे अल्प उत्पन्न गट (LIG) आणि अत्यल्प उत्पन्न गट (EWS) या दोन्ही गटांतील नागरिकांसाठी असतील. ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न 9 लाख रुपयांपर्यंत आहे, ते अल्प उत्पन्न गटात येतात. तर, ज्यांचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपर्यंत आहे, ते अत्यल्प उत्पन्न गटात येतात. या दोन्ही गटांतील लोकांसाठी ही घरे उपलब्ध होणार असून अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होईल.

Advertisement

कुठे आहेत ही घरे?

मुंबईतील ही 426 घरे मुंबईतील विविध भागांमध्ये उपलब्ध होणार आहेत. ज्यामुळे मुंबईकरांना त्यांच्या पसंतीच्या ठिकाणी घर घेण्याची संधी मिळेल. या ठिकाणांमध्ये जोगेश्वरी पूर्व, गोरेगाव पश्चिम, दहिसर पश्चिम, भायखळा पश्चिम, कांदिवली पश्चिम आणि पूर्व, अंधेरी पूर्व, कांजुरमार्ग आणि भांडुप पश्चिम या ठिकाणांचा समावेश आहे. उपलब्ध घरांपैकी सर्वाधिक 270 घरे भांडुप पश्चिममध्ये आहेत, तर उर्वरित 186 घरे इतर ठिकाणी असणार आहेत.

(नक्की वाचा- Film City in Nashik: नाशिकच्या इगतपुरीत उभारणार फिल्म सिटी, जमिनीलाही मंजुरी; काय आहे सरकारचा प्लान?)

भायखळा येथील घरे आकाराने लहान असूनही त्यांची किंमत जास्त असणार आहे. याउलट, उपनगरांतील घरे आकाराने मोठी असून त्यांची किंमत तुलनेत कमी आहे. म्हाडाप्रमाणेच या घरांची लॉटरी काढताना स्वातंत्र्यसैनिकांसाठी व इतर काही विशेष गटांसाठी राखीव कोटा ठेवण्यात येणार आहे. येत्या काही महिन्यांत महापालिकेला विकासकांकडून आणखी घरे मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मुंबईरांना घर खरेदीत पु्न्हा संधी मिळू शकते.

Advertisement

Topics mentioned in this article