
रेवती हिंगवे, पुणे
Pune Traffic Rule News: पुण्यात दिवसेंदिवस ट्रॅफिक जामची समस्या वाढत आहे. त्यासोबतच नियम मोडणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. पुणे वाहतूक पोलिसांनी आता जे नियम मोडतील त्यांच्यावर दहापट दंड आकारण्याचा नियम लागू केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सर्वात मोठा बदल ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये करण्यात आला आहे. ड्रिंक ड्राईव्हसाठी आधी फक्त 1000 रुपये दंड होता. मात्र आता हा नियम मोडल्यास 10 हजार रुपये भरावे लागतील किंवा 6 महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागेल. अनेक भीषण अपघात पुणे शहरात होत असल्याने आणि नियमांच पालन होत नसल्याने हे बदल करण्यात आले आहेत.
(नक्की वाचा- Pune News : पुण्यातील या ठिकाणाचे नाव बदलण्याची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मागणी)
कुठला नियम मोडल्यास किती दंड आकारण्यात येणार?
सीटबेल्ट शिवाय चालवणे, ट्रिपल सीट प्रवास करणे
जुना दंड: 100 रुपये
नवीन दंड: 1000 रुपये
हेल्मेटशिवाय गाडी चालवणे
जुना दंड: 100 रुपये
नवीन दंड: 1000 रुपये किंवा ३ महिन्यांसाठी लायसन्स जप्त
विमा नसलेले वाहन चालवणे
जुना दंड: 200-400 रुपये
नवीन दंड: 2000 रुपये (पहिल्यांदा)
4000 रुपये (दुसऱ्यांदा) किंवा ३ महिने तुरुंगवास
(नक्की वाचा- Nagpur Violence: संतापजनक! नागपूरमध्ये हिंसक जमावाने घेरलं अन्... महिला पोलिसांसोबत काय घडलं?)
अतिवेगाने गाडी चालवणे, सिग्नल उल्लंघन, लाइसन्सविना गाडी चालवणे, गाडी चालवताना मोबाईल वापरणे
जुना दंड : 500 रुपये
नवीन दंड: 5000 रुपये
मद्यप्रशान करून गाडी चालवणे
जुना दंड: 1500 रुपये
नवीन दंड: 10000 हजार रुपये किंवा 3 महिने तुरुंगवास
अल्पवयीन मुलाने वाहन चालवणे
जुना दंड: 25000 रुपये
नवीन दंड: 25 हजार रुपये किंवा 3 वर्षाचा तुरुंगवास आणि 1 वर्षासाठी वाहन नोंदणी रद्द
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world