जाहिरात

Dhule Shocking News: रस्त्यावर कार जळून खाक! आतमध्ये आढळली मानवी हाडे आणि कवटी, प्रकरण काय?

शिरपूर तालुक्यातील टेकवाडा–खामखेडा रस्त्यावर आज पहाटे घडलेल्या भीषण घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Dhule Shocking News:  रस्त्यावर कार जळून खाक! आतमध्ये आढळली मानवी हाडे आणि कवटी, प्रकरण काय?
Burning Car Accident Dhule News

नागिंद मोरे, प्रतिनिधी

Dhule Shirpur Burning Car News : शिरपूर तालुक्यातील टेकवाडा–खामखेडा रस्त्यावर आज पहाटे घडलेल्या भीषण घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. खामखेडा येथील चंद्रकांत प्रताप धनगर (43) यांच्या मालकीची एक कार (GJ-06-JO-6325) रस्त्यावर पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना आज घडली. या कारमध्ये मानवी हाडे आणि कवटी आढळल्याने अनेकांना धक्का बसला आहे. या कारमध्ये चंद्रकांत धनगरच असावेत,असा संशय त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत धनगर हे काही वर्षापासून सुरत येथे वास्तव्यास होते.ते त्यांच्या मुळगावी खामखेडा येथे वडील व भावाला भेटण्यासाठी येणार होते. घटनेच्या आदल्या दिवशी त्याने आपल्या भावाला फोन करून घरी येण्याबाबत सांगितलं होतं.

टेकवाडा–खामखेडा रस्त्यावर नेमकं काय घडलं?

ही घटना टेकवाडा–खामखेडा रस्त्यावर बन्सीलाल दगडू पाटील यांच्या शेताजवळ घडली.गहूच्या शेतात पहाटे पाणी भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना अचानक मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू आला. रस्त्यावर कार जळून खाक झाल्याचं त्यांनी पाहिलं. त्यानंतर ग्रामस्थांनी तातडीनं पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर कुमार परदेशी हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. जळून खाक झालेल्या कारमध्ये मानवी हाडे व कवटी आढळून आली.त्यामुळे हा अपघात की घातपात आहे?असा संशय व्यक्त केला जात आहे.

नक्की वाचा >> "धुरंधरमुळे अंगावर शहारेच आले..", 26/11 च्या रात्री ताज हॉटेलमध्ये 14 तास अडकली होती, ती महिला कोण?

वाहनात आग कशी लागली? स्फोट कशामुळे झाला?

या प्रकरणाची गंभीर दखल घेत फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. वाहनात आग कशी लागली? स्फोट कशामुळे झाला? याचा तपास संबंधीत अधिकाऱ्यांकडून सुरु आहे. हा अपघात नसून घातपाता असण्याची शक्यता नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.चंद्रकांत धनगर यांचा मृत्यू संशयास्पद असल्याने सखोल चौकशीची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी किशोर प्रताप धनगर (मोठा भाऊ) यांच्या तक्रारीवरून शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिरपूर शहर पोलीस पुढील तपास करत असून फॉरेन्सिक अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

नक्की वाचा >> सोनं नाही, 'हा' आहे जगातील सर्वात महागडा धातू, 1 ग्रॅमच्या किंमतीत येईल 200 किलो गोल्ड, कुठे सापडतो?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com