Accident News : नाशिकमध्ये खासगी बस दरीत कोसळली; 5 जणांचा मृत्यू, 15 जखमी

Nashik Bus Accident : नाशिक-गुजरात महामार्गावर सापुतारा घाटात पहाटे 5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातात जखमी असलेल्या काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रांजल कुलकर्णी, नाशिक

नाशिक-गुजरात महामार्गावर खासगी लक्झरी बसला भीषण अपघात झाला आहे. सापुतारा घाटात खासगी बस दरीत कोसळून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. जमखींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नाशिक-गुजरात महामार्गावर सापुतारा घाटात पहाटे 5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातात जखमी असलेल्या काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. गाडीतील प्रवाशांनी ड्रायव्हरला थांबण्याची सूचना केली होती. मात्र चालक मद्याच्या नशेत असल्याचे देखील प्रवाशांनी सांगितले..

(नक्की वाचा- Guillain Barre Syndrome : पुण्यात जीबीएसचे 28 रुग्ण व्हेंटिलेटरवर, पाच जण दगावले!)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकहून देवदर्शन करुन गुजरातकडे देवदर्शनासाठी भाविक जात असताना बसला अपघात झाला. ;चालकाचं बसवरील नियंत्र सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर बस थेट 200 फूट दरीत कोसळली.

(नक्की वाचा-  Ambarnath News : फोटोग्राफरसोबत 'हेरा फेरी'; डबलच्या नादात 50 हजारांचा गंडा)

अपघात इतका भीषण होता की बसचे अक्षरश: तुकडे झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचावर पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आले. बसमधील सर्व मयत आणि जखमी मध्य प्रदेशमधील असल्याची प्राथमिक माहिती आहे. 

Advertisement

Topics mentioned in this article