जाहिरात

Ambarnath News : फोटोग्राफरसोबत 'हेरा फेरी'; डबलच्या नादात 50 हजारांचा गंडा

Ambarnath Crime News : आयुष जाधव हा तरुण अंबरनाथमधील एका राजकीय नेत्याकडे फोटोग्राफर म्हणून काम करतो. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या भामट्यांचा शोध घेत आहेत.

Ambarnath News : फोटोग्राफरसोबत 'हेरा फेरी'; डबलच्या नादात 50 हजारांचा गंडा

अंबरनाथमध्ये फोटोग्राफरला भामट्यांनी गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. हा फोटोग्राफर बँकेत पैसे भरण्यासाठी गेलेला असताना त्याच्याकडून 50 हजार रुपये घेऊन 1 लाख रुपये देतो असं सांगत 2 भामट्यांनी त्याला चक्क पेपरच्या घड्या दिल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या भामट्यांचा शोध घेत आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आयुष जाधव हा तरुण अंबरनाथमधील एका राजकीय नेत्याकडे फोटोग्राफर म्हणून काम करतो. 31 जानेवारी रोजी दुपारी तीनच्या सुमारास तो अंबरनाथ पूर्वेच्या बँक ऑफ बडोदामध्ये 50 हजार रुपये रोख जमा करण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला बँकेत एक अनोळखी इसम भेटला. 

(नक्की वाचा- Crime News: आधी प्रेमात पडले, नंतर ब्रेकअप केले, पुढे 'तिच्या' बरोबर जे घडले त्याने सगळेच हादरले)

या अनोळखी इसमाने "तुझ्याजवळचे 50 हजार रुपये तू मला दे, आणि त्याबदल्यात मी तुला माझ्या जवळचे एक लाख रुपये देतो, त्यातले ५०  हजार रुपये तू तुझ्या बँक खात्यातून माझ्या बायकोला पाठव, इथे माझं बँक खातं नाही" असं सांगितलं. याचवेळी तिथे एक दुसरा इसम आला आणि त्याने "हा माणूस गरीब आहे, चांगला आहे, याची मदत कर" असं सांगत रुमालात पैसे गुंडाळून आयुषला दिले. 

(नक्की वाचा-  CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली)

आयुषनेही विश्वासाने रुमालात गुंडाळून दिलेली रक्कम न पाहताच ती बँकेत डिपॉझिट करायला निघून गेला. मात्र काही वेळाने बँकेत जाऊन त्याने रुमाल उघडून पाहिला असता त्याला रुमालात चक्क वर्तमानपत्राच्या घड्या सापडल्या. यानंतर आयुषला ज्या व्यक्तीने पैसे दिले, त्याचा शोध घ्यायला बँकेच्या बाहेर येऊन पाहिलं असता तिथे त्याला ते 2 भामटे कुठेही सापडले नाहीत. यानंतर मात्र आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच आयुषने पोलीस ठाण्यात धाव घेऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: