जाहिरात

'राज्यभरात वाटप केलेले 55 लाख बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द करा'; संभाजीनगरात लागले होर्डिंग

'राज्यभरात वाटप केलेले 55 लाख बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द करा'; संभाजीनगरात लागले होर्डिंग
छत्रपती संभाजीनगप:

राज्यभरात वाटप करण्यात आलेले 55 लाख बनावट कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात यावे असे होर्डिंग छत्रपती संभाजीनगर शहरात (Hoardings in Chhatrapati Sambhajinagar) वंचित बहुजन आघाडीकडून लावण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाओ यात्रा आज संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहे. तसेच शहरातील आमखास मैदानावर जाहीर सभा घेऊन या यात्रेचा समारोप केला जाणार आहे. मात्र त्यापूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील चौका चौकात वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी संघटनांकडून होर्डिंग लावण्यात आले आहे आहेत. ज्यात कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. 100 ओबीसी आमदार निवडून आणणार, तसेच सरंजामी मराठा पक्षांच्या हातातील बाहुली असणाऱ्यांना मतदान करणार नाही असा उल्लेख या बॅनरवर पाहायला मिळतोय. 

प्रकाश आंबेडकर यांनी 25 जुलैपासून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात केली आहे. आज संभाजीनगरमध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे. सोबतच शहरातील आमखास मैदानावर प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा देखील आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे या सभेत प्रकाश आंबेडकर नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळत आहे. असे असतानाच प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी, एससी, एसटी एक होणार आणि आपले आरक्षण वाचणार अशी हाक दिली आहे. 

नक्की वाचा - महायुतीची डोकेदुखी वाढणार! विधानसभा निवडणुकीत या 18 मतदारसंघात बंडखोरीची शक्यता

100 ओबीसी निवडून आणणार....
ओबीसी आरक्षण वाचलं पाहिजे अशी भूमिका प्रकाश आंबेडकर सतत मांडत आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे. मात्र ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये अशी भूमिका देखील त्यांनी घेतली आहे. दरम्यान कुणबी मराठा उमेदवारांना मतदान करू नका असं थेट वक्तव्य देखील काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी केले होते. असं असतानाच आज होणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्या सभास्थळी 100 ओबीसी आमदार निवडून आणणार असे होर्डिंग पाहायला मिळत आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com