सध्या राज्यभरात विधानसभेच्या (Maharashtra Vidhan Sabha) निवडणुकीची तयारी सुरू आहे. दरम्यान आगामी विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 18 विद्यमान आमदारांच्या मतदारसंघामध्ये बंडखोरी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जर राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी निवडणूक लढवली तर महायुतीत बंडखोरी होणार असल्याचं तुर्तास दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मावळ, दिंडोरी, कागल, इंदापूर, वडगाव शेरी, आष्टी, कोपरगाव, अहेरी, अकोले, पूसद, जुन्नर, वाई या मतदारसंघात महायुतीमध्ये धुसफूस सुरू आहे.
महायुतीत बंडखोरी झाल्यास अनेक नेते महाविकास आघाडीच्या गळाला लागण्याची शक्यता आहे. मात्र बंडखोरी झाल्यास महायुतीची डोकेदुखी वाढणार हे मात्र निश्चित आहे.
नक्की वाचा - काँग्रेसच्या विद्यमान आमदारांची धाकधूक वाढणार? तिकीट वाटपाचा निकष ठरला
या 18 मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरीची शक्यता...
दिंडोरी- नरहरी झिरवाळ विरुद्ध माजी धनराज महाले शिंदे शिवसेना-
कागल- हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे (भाजप)
चंदगड- राजेश पाटील विरुद्ध शिवाजी पाटील (भाजप अपक्ष)
मावळ- सुनील शेळके विरुद्ध बाळा भेगडे
इंदापूर- दत्तामामा भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील
वडगाव शेरी- सुनील टिंगरे विरुद्ध जगदीश मुळीक (भाजप)
हडपसर- चेतन तुपे विरुद्ध नाना भानगिरे (शिवसेना शिंदे)
आष्टी- बाळासाहेब आजबे विरुद्ध सुरेश धस (भाजप)
कोपरगाव- आशुतोष काळे विरुद्ध विवेक कोल्हे (भाजप)
अर्जुनी मोरगाव- मनोहर चंद्रिकापुरे विरुद्ध माजी मंत्री राजकुमार बडोले (भाजप)
अहिरी- धर्मरावबाबा अत्राम विरुद्ध अमरिश राजे (भाजप)
पुसद- इंद्रनील नाईक विरुद्ध नीलय नाईक
अकोले- किरण लहामटे विरुद्ध वैभव पिचड (भाजप)
येवला- छगन भुजबळ विरुद्ध अमृता पवार (भाजप)
अमळनेर- अनिल पाटील विरुद्ध माजी आमदार शिऱिष चौधरी (भाजप)
सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे विरुद्ध शशिकांत खेडेकर (शिवसेना)
जुन्नर- अतुल बेनके विरुद्ध शरद सोनवणे (शिंदे)
वाई- मकरंद पाटील विरुद्ध मदन भोसले (भाजप)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world