![Nagpur Accident : विचित्र अपघात; कार विहिरीत कोसळून तिघांचा मृत्यू Nagpur Accident : विचित्र अपघात; कार विहिरीत कोसळून तिघांचा मृत्यू](https://c.ndtvimg.com/2025-02/iag4bji_nagpur-car-accident_625x300_11_February_25.jpg?im=FaceCrop,algorithm=dnn,width=773,height=435)
प्रविण मुधोळकर, नागपूर
नागपूरमधून अपघाताची विचित्र घटना समोर आली आहे. कार शिकत असताना अनियंत्रित झालेली कार विहिरीत कोसळली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. नागपूरच्या बुट्टीबोरी एमआयडीसी परिसरात बालभारती ग्राउंडवर ही घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी बुटीबोरी इंडस्ट्रियल परिसरातील बालभारती ग्राउंडवर तीन तरुण कार शिकत होते. रात्री 11 वाजता कार शिकत असताना चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं. त्यानंतर अनियंत्रित कार जवळील विहिरीत कोसळली.
![Nagpur Car Accident Nagpur Car Accident](https://c.ndtvimg.com/2025-02/vp4kuvuo_nagpur-car-accident_625x300_11_February_25.jpg?im=FaceCrop,algorithm=dnn,width=1200,height=738)
Nagpur Car Accident
कारचा स्पीड इतका जास्त होता की विहिरीचे कठडा तोडून कार विहिरीत कोसळली. या विहिरीत जवळपास 20 फूटांपर्यंत पाणी होते. त्यामुळे कारमधील तिघांचा बुडून मृत्यू झाला. बुटीबोरी पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world