देवा राखुंडे, दौंड
पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव ट्रकने कारला दिलेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला आहे. दौंड तालुक्यातील बाखारी येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या कारला भरधाव ट्रकने जोरदार धडक देत फरफटत नेलं. अपघाताचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रोहित प्रकाश पोकळे (वय 30 वर्ष) याच्या कमरेवरुन ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सुरज मधुकर पेटाडे, विजय श्रीनिवास धीरसागर हे गंभीर जखमी झालेत. हे सर्वजण पुणे येथील रहिवाशी आहेत. ट्रक चालकाने दारु प्यायल्याची माहिती मिळत आहे.
(नक्की वाचा- मुख्यमंत्रिपदाबाबत शरद पवार पहिल्यांदाच थेट बोलले, मविआमध्ये नवा ट्विस्ट)
मिळालेल्या माहितीनुसार, सुरज पेटाडे यांच्या कार चार मित्र देवदर्शनासाठी सोलापूरकडे निघाले होते. दरम्यान कार गरम झाल्याने दौंड तालुक्यातील बाखारी येथे रस्त्याच्या बाजूला सर्वजण थांबले होते. याच वेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने कारला जोरदार धकड देत फरफटत नेले.
( VIDEO: 'किमान हसू तरी नका', कोलकाता हत्या प्रकरणातील सुनावणी दरम्यान कपिल सिब्बलांना कुणी सुनावलं? )
दरम्यान रोहितच्या कमरेवरुन ट्रकचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सुरज पेटाडे याला कारसह फरफटत नेल्याने तो गंभीर झाला. विजय क्षीरसागर याला देखील गंभीर इजा झाली आहे.