जाहिरात

Mumbai News: मध्य रेल्वेची वाहतूक 15-20 मिनिटे उशिरा; रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचे हाल

Central Railway Chaos: मध्य रेल्वेवर पुन्हा एकदा प्रवाशांचे हाल झाले आहेत. खर्डी स्थानकाजवळ घेण्यात आलेला तांत्रिक ब्लॉक वेळेत न संपल्यामुळे आज सकाळी लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली.

Mumbai News: मध्य रेल्वेची वाहतूक 15-20 मिनिटे उशिरा; रेल्वे स्टेशनवर प्रचंड गर्दीमुळे प्रवाशांचे हाल

रिझवान शेख, ठाणे

Mumbai News : मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकल सेवा आज दुसऱ्या दिवशी देखील विस्कळीत झालेली दिसली. मध्य रेल्वेच्या खर्डी स्थानकाजवळ रात्रभर घेण्यात आलेला तांत्रिक ब्लॉक सकाळी 3 वाजेपर्यंत संपणे अपेक्षित होते. परंतु तो 6 वाजेपर्यंत लांबल्याने उपनगरीय रेल्वे सेवेचे वेळापत्रक कोलमडले आहे.

रेल्वे प्रशासनाने रात्री खर्डी येथे तांत्रिक कामासाठी ब्लॉक घेतला होता. हा ब्लॉक 3 वाजता संपून वाहतूक पूर्ववत होणे अपेक्षित होते. परंतु कामात विलंब झाल्यामुळे तो थेट पहाटे 6 वाजेपर्यंत सुरू राहिला. यामुळे एक्सप्रेस गाड्या आणि लोकल सेवेचा वेग मंदावला. त्याचा थेट परिणाम पहाटेच्या लोकल फेऱ्यांवर झाला.

(नक्की वाचा-  Aurangpura Renamed: छत्रपती संभाजीनगरमधील औरंगपुराचं नाव बदललं; महापालिकेत नामांतराचा प्रस्ताव मंजूर)

प्रवाशांची स्थानकांवर तुफान गर्दी

लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे आणि 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत असल्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी कोंडी झाली आहे. ठाणे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक 3 आणि 4 वर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली. दिवा स्थानकात देखील प्रवाशांना लोकलच्या प्रतीक्षेत तासनतास थांबावे लागत आहे.

(नक्की वाचा-  Bhendwal Bhakit: राज्यात पाऊस कसा असेल? राजकीय उलथापालथ होणार? भेंडवळच्या भाकितानं चिंता वाढली)

प्रवाशांचा संताप

सकाळी कामावर जाण्याच्या वेळीच लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. ब्लॉक उशिरापर्यंत का चालला आणि याचे पूर्वसूचना प्रवाशांना का दिली गेली नाही, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, रेल्वेचे अधिकारी वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगत आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com