जाहिरात

मध्य रेल्वेवर तब्बल 22 तासांचा पॉवर ब्लॉक, अनेक गाड्या रद्द

या पॉवर ब्लॉकमुळे अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही शॉर्ट टर्मिनेशन्स करण्यात आले आहेत.

मध्य रेल्वेवर तब्बल 22 तासांचा पॉवर ब्लॉक, अनेक गाड्या रद्द
मुंबई:

मध्य रेल्वेवर 20 ऑक्टोबर आणि 21 ऑक्टोबरला स्पेशल पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवार आणि सोमवारी हा स्पेशल पॉवर ब्लॉक असेल. कसारा रेल्वे स्थानकातील नॉन इंटरलॉकींग कामांसाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सेवेवर या दोन दिवसात परिणाम होणार आहे. या पॉवर ब्लॉकमुळे अनेक ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही शॉर्ट टर्मिनेशन्स करण्यात आले आहेत. कसारा रेल्वे स्थानकावरील डाउन यार्डमधील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 3 च्या विस्तारासाठी हा ब्लॉक असेल. हा पॉवर ब्लॉक रविवारी 3.20 वाजता सुरू होईल. तर सोमवारी 1.20 वाजता संपेल. हा जवळपास 22 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक असेल. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कधी असणार ब्लॉक?

मध्य रेल्वेच्या डाउन लाइनवर 20 ऑक्टोबर 2024 म्हणजे रविवारी 10.40 वाजल्यापासून ते दुपारी 1.40 वाजेपर्यंत पॉवर ब्लॉक असेल. तर अप लाइनवर 20 ऑक्टोबर 2024 रोजी 12.40 वाजल्यापासून ते 1.40 वाजेपर्यंत म्हणजे 1 तासाचा पॉवर ब्लॉक असेल. तर अप आणि डाउन लाईन्स एकत्रित 20 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजे रविवार 7.20 वाजल्यापासून ते 21 ऑक्टोबर 2024 म्हणजे सोमवारी 1.20 वाजेपर्यंत असेल. हा जवळपास 6 तासांचा पॉवर ब्लॉक असणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी - तळकोकणात राणेंना धक्का, तर शिंदे सेनेचे टेन्शन वाढणार? ठाकरेंच्या गळाला बडा नेता

कोणत्या ट्रेन रद्द, कोणत्या ट्रेन शॉर्ट टर्मिनेशन्स

11012 धुळे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस आणि  11011 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- धुळे एक्स्प्रेस या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. 12140 नागपूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सेवाग्राम एक्स्प्रेस 19 ऑक्टोबर 2024 रोजी सुटलेली नाशिक रोड येथे रद्द होईल. तर 12187 जबलपूर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस गरीबरथ एक्स्प्रेस 19 ऑक्टोबर 2024 मनमाड येथे शॉर्ट टर्मिनेट होईल.

ट्रेंडिंग बातमी - नवनीत राणांनंतर रवी राणांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध, पुन्हा खेला होणार?

अनेक मेल एक्सप्रेस गाड्या ही रद्द 

या ब्लॉक कालावधीत अनेक मेल एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काहींची ठिकाणं बदलण्यात आली आहेत. त्यामुळे 20 ऑक्टोबर आणि 21 ऑक्टोबरला जर कोणी मध्य रेल्वेवर प्रवास करणार असतील तर त्यांनी आधी आपल्या गाड्यांचे वेळापत्रक पहावे असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहेत.   

Listen to the latest songs, only on JioSaavn.com