जाहिरात

पावसाचा लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना फटका, काही रद्द तर काहींच्या वेळा बदलल्या, पाहा वेळापत्रक

गाडी क्रमांक 20706 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- जालना वंदे भारत एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

पावसाचा लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना फटका, काही रद्द तर काहींच्या वेळा बदलल्या, पाहा वेळापत्रक
छत्रपती संभाजीनगर:

Mumbai Rain: मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस होत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईतल्या उपनगरीय रेल्वेला त्याच फटका बसला आहे. मध्य रेल्वेची वाहतूक तर ठप्प झाली आहे. त्यामुळे मुंबईत येणाऱ्या लांब पल्ल्याच्या (long distance train) रेल्वे गाड्यांवर त्याचा परिणाम झाला आहे. खास करून मराठवाड्यातून येणाऱ्या काही गाड्या या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. तसेच काही गाड्यांची शॉर्ट टर्मिनेशन म्हणजे अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.

नक्की वाचा- मुंबईत पावसाचा विक्रम! फक्त 3 दिवसांत पडला अर्ध्या महिन्याचा पाऊस, पुढील 24 तासासाठी रेड अलर्ट


पुढील गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. 

गाडी क्रमांक : 12071
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हिंगोली
नियोजित वेळ : 12:10 वाजता
गाडी सुटण्याची नवीन वेळ : 16:45 वाजता

गाडी क्रमांक : 20706
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - जालना
नियोजित वेळ : 13:10 वाजता
गाडी सुटण्याची नवीन वेळ : 17:15 वाजता

गाडी क्रमांक : 17612
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - हुजूर साहिब नांदेड
नियोजित वेळ : 18:45 वाजता
गाडी सुटण्याची नवीन वेळ : 21:00 वाजता

शॉर्ट टर्मिनेशन (Short Termination)

गाडी क्रमांक : 12072
हिंगोली -छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
इगतपुरी येथे गाडी थांबवण्यात आली आहे.

रद्द करण्यात आलेली ट्रेन 

गाडी क्रमांक 20706 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- जालना वंदे भारत एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना विनंती आहे की प्रवासापूर्वी आपल्या गाडीची अद्ययावत माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा हेल्पलाईनवरून तपासून घ्यावी, त्यानंतरच प्रवास करावा असे आवाहन रेल्वे तर्फे करण्यात आले आहे. पावसामुळे लांब पल्ल्याच्या  रेल्वे वाहतूकीला ही आता फटका बसला आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com