जाहिरात

CIDCO Lottery : सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार? सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार?

CIDCO Lottery 2025 : सिडकोने 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' योजनेतील घरांच्या किमती पाहून सर्वसामान्यांचे डोळे विस्फारले आहेत. काही दिवसांपूर्वीच सिडकोने आपल्या घरांच्या किमती जाहीर केल्या आहेत.

CIDCO Lottery : सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार? सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार?

राहुल कांबळे, नवी मुंबई

मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात नवीन घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सर्वसामान्यांना परवडणारी घरे म्हाडा आणि सिडकोकडून उभारली जातात. मात्र म्हाडाच्या घरांच्या किमती देखील सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर पोहोचल्याचं दिसलं. तर सिडकोच्या घरांच्या किंमतीही वाढल्याने घराचं स्वप्न पाहणाऱ्यांची निराशा झाली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सिडकोने 'माझे पसंतीचे सिडकोचे घर' योजनेतील घरांच्या किमती पाहून सर्वसामान्यांचे डोळे विस्फारले आहेत. काही दिवसांपूर्वीच सिडकोने आपल्या घरांच्या किमती जाहीर केल्या आहेत. मात्र सिडकोची परवडणारी घरे सर्वसामान्यांना परवडत नसल्याने आता ही घरे कोण विकत घेणार असा प्रश्न आहे.   

(नक्की वाचा -  CIDCO Lottery : सिडकोच्या 26,000 घरांच्या किमती जाहीर, 25 लाखांपासून मिळणार स्वप्नांचं घर, अर्जाची अंतिम मुदत कधीपर्यंत?)

अनेक नागरिकांनी सिडकोच्या या योजनेतीन घरांसाठी अर्ज केला आहे. मात्र घरांच्या किंमती पाहून इच्छा असून अनेकांना ही घरे खरेदी करता येणार नाहीत. आम्ही स्वस्तात घर मिळणार म्हणून सिडकोच्या योजनेत अर्ज भरला होता. त्यामुळे घरांच्या किमती कमी कराव्यात, अशी विनंती नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

(नक्की वाचा- Narayan rane: मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचा भाई-दादांना ठेंगा? नारायण राणेंचे मोठे वक्तव्य)

सिडकोच्या घरांच्या किंमती

गट EWS ( आर्थिक दुर्बल घटक - कार्पेट 322 )

  • तळोजा सेक्टर 28 - 25.1 लाख 
  • तळोजा सेक्टर 39 -26. 1 लाख 
  • खारघर बस डेपो, सेक्टर 14 - 48. 3 लाख 
  • खारकोपर  2A - 38.6 लाख 
  • खारकोपर  2B - 38.6 लाख 
  • कळंबोली बस डेपो  - 41.9 लाख 
  • बामणडोंगरी -31. 9 लाख 

अल्प उत्पन्न गट एलआयजी -LIG

  • पनवेल बस टर्मिनस - 45.1 लाख
  • खारघर बस टर्मिनस- 48.3 लाख 
  • तळोजा सेक्टर 37 - 34.2 लाख /46.4 लाख 
  • मानसरोवर रेल्वे स्टेशन -41.9 लाख 
  • खांदेश्वर रेल्वे स्टेशन -46.7 लाख खारकोपर ईस्ट - 40.3 लाख 
  • वाशी ट्रक टर्मिनल - 74.1 लाख 
  • खारघर स्टेशन सेक्टर वन A- 97.2 लाख 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com